भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत, मनीषा कायंदेंचं टीकास्त्र

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्यामुळे ते विचलित झाले आहेत, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. Manisha Kayande Devendra Fadnavis

भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत, मनीषा कायंदेंचं टीकास्त्र
मनीषा कायंदे देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 3:56 PM

मुंबई: भांडूप इथ एका मॉल मध्ये जिथ आता कोव्हिड सेंटर उभारलं होतं तिकडे एक दुर्दैवी प्रकार घडला आणि त्या ठिकाणी आग लागली. अनेक लोक मृत्युमुखी पडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिकडे पाहणी करायला गेले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. परंतु तिकडे जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणं. आगीची पाहणी करणं किंवा त्याची चौकशीची मागणी करणं हे आम्ही समजू शकतो. परंतु तिकडे जाऊन देखील महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकीय विषय हे देखील ते बोलायचे विसरले नाहीत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्यामुळे हे इतके विचलित झाले आहेत की मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला देखील ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी खरा चेहरा ओळखलेला आहे, असंही त्या म्हणाल्या. (Shivsena leader Manisha Kayande slams Devendra Fadnavis)

सरकार बदललं तरी यंत्रणा बदलत नाही

गृह विभागाचा जो अहवाल आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की जी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच यंत्रणा आता देखील आहे .सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते म्हणजे हे सर्व अधिकारी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सिताराम कुंटे यांच्या सारखे एक मराठी आयएएस अधिकारी यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकार्‍यांवर देखील ते आता अविश्वास दाखवत आहेत आणि त्यांची बदनामी करत आहेत हे अतिशय घृणास्पद आहे, असं मनीषा कायंदे म्हणाल्या.

गृह विभागाचा अहवाल जो एक प्रसिद्ध झाला त्याबद्दल तपास निश्चितच होईल. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल सविस्तर बाजू मांडली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जो कबुलीजबाब दिलेला आहे तो देखील सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोण राजकारण करत आहे आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बळी पाडले जात आहे. त्यांना हाताशी धरुन राजकारण केले जात आहे. हे आता महाराष्ट्राची जनता पाहत आहे, असं मनीषा कायंदेंनी स्पष्ट केलं.

मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य लवकर बाहेर यावं

मनसुख हिरेन याच्या तोंडामध्ये जे रुमाल कोंबले होते ते आता गायब झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. हा तपास एटीएस करत होती आणि आता तपास एनआयएकडे सोपवला आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर यावं असं आम्हाला देखील वाटतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असं पहिल्याचं दिवशी सांगितल्याचं मनीषा कायंदे म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

नाना पटोले म्हणाले, राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावं, थोरात म्हणतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

रश्मी शुक्लांचा दबाव झुगारला; कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?

(Shivsena leader Manisha Kayande slams Devendra Fadnavis)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.