नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा खोचक टोला

गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. (shivsena leader manisha kayande taunt narayan rane over ganesh idol height)

नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा खोचक टोला
manisha kayande
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 5:36 PM

मुंबई: गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे. (shivsena leader manisha kayande taunt narayan rane over ganesh idol height)

मनिषा कायंदे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा टोला लगावला आहे. कोकणात आणि मुंबईत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मूर्तीची उंची जेवढी मोठी तेवढे माणसं अधिक लागतात. शिवाय मोठ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे गेल्या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीला चरा फुटाची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे 10 ते 15 भाविकांमध्ये विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं होतं. 20-22 फुटांच्या मूर्ती असतील तर कार्यकर्त्यांचा लवाजमा अधिक लागतो. आता राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा चिमटा काढतानाच केंद्रीय मंत्र्यांनी गणपतीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काय संबंध? असा प्रश्न करणं हे दिवाळखोरीचं लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तिसरी लाट आलीय

ही जागतिक महामारी आहे. या विषयाचं गांभीर्य अनेकांना समजलं आहे. दुर्देवाने काही लोकांना समजलं नाही. केंद्र शासनाने कडक सूचना केलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट कायदा हा देशात लागू आहे. तसेच 144 कलम लावण्याचा अधिकार पोलिसांचा आणि शासनाचा आहे. गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. तिसरी लाट आली आहे, असं त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षाला भान नाही

विरोधी पक्षाला काही जबाबदारी नाही. त्यांना जबाबदारीचे भान नाही. असती तर अशी भाषा वापरली नसती. केंद्र सरकारनेही कोरोना संदर्भात राज्याला सूचना केलेल्या आहेत. केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेला ते मान्य करणार नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.

आरोपींना फाशी द्या

मुंबईतील साकीनाका येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईतील साकीनाका इथे घडलेली गँगरेपची घटना अतिशय संतापजनक आहे. गणेश चतुर्थी हा धार्मिक दिवस आहे. अशा वेळेला ही घटना घडते हे वाईट आहे. 2016मध्ये दिल्लीमध्ये अशीच घटना घडली होती. पण या घटनेतील आरोपींना ताबडतोब अटक करण्यात आली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कडक शिक्षा झाली पाहिजे. राज्यात शक्ती कायद्या अंतिम टप्प्यात आहे. या कायद्यातील सुधारणांमुळे हे दोन्ही कायदे सभागृहात पारित व्हायचे आहेत. या सगळ्या गोष्टीकडे न पाहता आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

साकीनाक्यात काय घडलं?

साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात सळई टाकण्याचा संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना ताज्या असताना आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) ही घटना घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. संबंधित घटना ही दहा वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कारासारखी आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. याप्रकरणी पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं आवश्यक आहे. (shivsena leader manisha kayande taunt narayan rane over ganesh idol height)

संबंधित बातम्या:

आधी म्हणाले, मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही, आता म्हणतात, आले तर स्वागत करू; राणेंची तीन दिवसात पलटी

संतापजनक ! मुंबईत दिल्लीच्या निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती, महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेच्या गुप्तांगावर वार

‘त्या’ सूचना केंद्राच्या गृहखात्याच्याच, नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी; विनायक राऊतांची खोचक टीका

(shivsena leader manisha kayande taunt narayan rane over ganesh idol height)

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.