मोठी बातमी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रूग्णालयात दाखल

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईमधील हिंदुजा या रूग्णालयात त्यांना दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट आली नाही.

मोठी बातमी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रूग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 6:20 PM

निवृत्ती बाबर, मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हिंदुजा रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीसुद्धा मनोहर यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला. मात्र पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे काल हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय विश्वासाचे आणि जवळचे सहकारी मानले जायचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संविधानिक पदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं.  मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

ब्रेन हॅमरेजचा झाला होता त्रास

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

बाळासाहेब गेल्यानंतर जोशींचा दसरा मेळ्याव्यामध्ये अपमान

शिवसेनेत राहून देखील मनोहर जोशी यांना अपमान सहन करावा लागला होता, बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात अपमान सहन करावा लागला होता. दसरा मेळाव्यात शिवसैनिक मनोहर जोशी मंचावर येताच विरोधात घोषणाबाजी करत असताना मनोहर जोशी मंच सोडून निघून गेले होते यावेळी उद्धव ठाकरे किंवा इतर नेत्यांनी थांबावलं नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेत वाढता संक्रिय सहभाग झाल्यानंतर मनोहर जोशी यांची शिवसेनेतील सक्रियता कमी झाली होती, त्यांचं वाढतं वय हा देखील एक मुद्दा होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.