Video: माथेरान शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद सावंतांवर जीवघेणा हल्ला; बंडखोर समर्थकांकडून जीवघेणा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू
महाविकास आघाडी आणि बंडखोर आमदार यांच्यामध्ये आता वाक्ययुद्ध सुरू आहे. महाविकास आघाडीच्या समर्थनाथ असलेले कार्यकर्ते आपापल्या परीने पक्षाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी घेत आहेत, तर विरोधकांकडून जोरदारपणे टीका केली जात आहे.
माथेरान : माथेरानचे शिवसेना (Matheran Shivsena) संपर्कप्रमुख माजी नगरसेवक प्रसाद सावंत (Shivsena Leader Prasad Sawant) यांच्यावर 15 ते 16 शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात (Attack) ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यातील बंडखोर आमदार गुवाहाटीला गेल्यापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील या राजकीय परिस्थितीचे वारे सोशल मीडियावरही चालू आहे.
VIDEO : Shivsena Corporator Prasad Sawant यांच्यावर अज्ञातांचा हल्ला – tv9#PrasadSawant #Shivsena pic.twitter.com/C0iTYEPxv2
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2022
प्रसाद सावंत यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर दुपारच्या वेळी 15 ते 16 जणांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर पडसाद
विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर दिसून आले. समर्थनाथ आणि विरोधातही या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर दिसून आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर समर्थन केल्यानं बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप केला गेला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कारचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
समर्थन आणि विरोधही
महाविकास आघाडी आणि बंडखोर आमदार यांच्यामध्ये आता वाक्ययुद्ध सुरू आहे. महाविकास आघाडीच्या समर्थनाथ असलेले कार्यकर्ते आपापल्या परीने पक्षाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी घेत आहेत, तर विरोधकांकडून जोरदारपणे टीका केली जात आहे.
शिवसैनिकांकडून हल्ला
या प्रकारातूनच माथेरानचे शिवसेना संपर्कप्रमुख माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून एमजीेएण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे.