“आपण मुळात शिवसैनिक नाही”; शिवसेनेच्या नेत्यानं संजय राऊत यांना जागा दाखवली

एकदा त्यांनी माझ्यासमोर अश्लील भाषेत शिव्या घातल्या होत्या. उद्धव आणि रश्मी वहिनींनाही संजय राऊत यांनी शिव्या घातल्या होत्या असा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

आपण मुळात शिवसैनिक नाही; शिवसेनेच्या नेत्यानं संजय राऊत यांना जागा दाखवली
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 4:49 PM

मुंबईः शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवरही जोरदार टीका केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर त्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही संजय राऊत यांच्यावर लक्ष्य करत निशाणा साधला. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

त्यातच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्यालाला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून आता शिवसेनेचे नेते आक्रमक होत, संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेच्या नेत्याने संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठीच कटकारस्थानं केली जात असल्याची टीकाही रामदास कदम यांनी केली आहे.

शिवसेनेच्या नेत्यानी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर अनेकांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मात्र रामदास कदम यांनी त्यांच्यावर कधी टीका केली नव्हती.

त्यानंतर आता राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे आता रामदास कदम यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत संजय राऊत यांच्यावर कधीच टीका केली नव्हती मात्र आता डोक्यावरून पाणी जात आहे म्हणत त्यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी अनेक नेत्यांवर टीका केली होती. माझ्यासमोर त्यांनी ठाकरे घराण्यातीलही अनेक नेत्यांवर टीका केली होती.

तर एकदा त्यांनी माझ्यासमोर अश्लील भाषेत शिव्या घातल्या होत्या. उद्धव आणि रश्मी वहिनींनाही संजय राऊत यांनी शिव्या घातल्या होत्या असा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

संजय राऊत ठाकरे गटाचे नेते असले तरी आणि शिवसेनेचे नेते म्हणून घेत आहेत मात्र आपण मुळात शिवसैनिक नसल्याचा टोला संजय राऊत यांना रामदास कदम यांनी लगावला आहे. ॉ

आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे भावदेखील संजय ठाकरे ठरवतात असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर संजय राऊत आता केंद्रीय निवडणूक आयोगावरही त्यांनी भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचे आता अति झालं आहे त्यामुळे आता त्यांची माती होणार असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.