शिवसेनेच्या आमदारांबाबतची मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शनमोडवर; आठ दिवसात काय घडणार?

शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी होणार? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. ठाकरे गटाकडून हा सवाल केला जात आहे. मात्र, आता आमदार अपात्रतेच्या सुनावणीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

शिवसेनेच्या आमदारांबाबतची मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शनमोडवर; आठ दिवसात काय घडणार?
rahul narvekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 11:21 AM

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : शिंदे आणि ठाकरे गटासाठी मोठी बातमी आहे. आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीला आता सुरुवात होत आहे. स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहे. या प्रकरणातील सर्व याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी करतील. प्रत्येक आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर त्यावर ते निर्णय देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जलदगतीने होणार आहे. त्यामुळे या आठ दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्वच्या सर्व शिवसेना आमदारांची सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. दिवसभर ही सुनावणी चालणार आहे. साधारण दोन दिवस ही सुनावणी चालेल. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी आलेल्या 34 याचिकाही निकाली काढणार आहेत. त्यामुळे येत्या 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीत ठाकरे गटाला दिलासा मिळतो की शिंदे गटाला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांचं भवितव्य सुनावणीवर

विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीवर अनेकांची भवितव्य ठरणार आहेत. या सुनावणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भवितव्य ठरणार आहे. तसेच सरकारचंही भवितव्य ठरणार आहे. शिंदे गटाकडे पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही याचंही भवितव्य अवलंबून आहे. जसं शिंदे गटाचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. तसेच ठाकरे गटाचंही भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष राहणार की नाही याचंही भवितव्य या सुनावणीत ठरणार आहे. या सुनावणीत आमदार अपात्र झाल्यास किंवा आमदार अपात्र नाही झाल्यास पुढील राजकीय गणितं ठरणार आहे. आमदार पात्र-अपात्रतेच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निकालही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एव्हाना निकाल यायला हवा होता

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढ्यात विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी संपून हा निकाल द्यायला हवा होता. विधिमंडळाचे सर्व नियम ढाब्यावर बसून इतका उशीर केला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.