Pratap Sarnaik ED | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांसह विहंगला ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे (Shivsena MLA Pratap Sarnaik and son Vihang Sarnaik summoned by ED)
मुंबई : टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे. प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यालाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यात प्रताप सरनाईक यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Shivsena MLA Pratap Sarnaik and son Vihang Sarnaik summoned by ED)
ईडीने मंगळवारी (25 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं होतं.
यानंतर आता आठ दिवसांनी प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा समन्स जारी केला आहे. यात ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान विहंग सरनाईक यांना ईडीनं दोन वेळा समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशीसाठी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ही चौकशी टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ईडीची सरनाईकांच्या घर, कार्यालयावर छापेमारी
दरम्यान, ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (Shivsena MLA Pratap Sarnaik and son Vihang Sarnaik summoned by ED)
संबंधित बातम्या :
आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता
क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती