हो खरंय, ईडीनं हिरानंदाणी येथील घर, मिरा रोडचा भूखंड जप्त केलाय, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया
हो खरंय, ईडीनं हिरानंदाणी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केलाय, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई: शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी माध्यमांसमोर ईडीनं (ED) त्यांची संपत्ती जप्त केल्यासंदर्भात बाजू सविस्तरपणे मांडली. वस्तुस्थिती आहे, ईडीनं गेल्या आठवड्यातील माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केल्याबद्दल मला आणि कुटुंबीयांना नोटीस पाठवलेलं आहे. त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणं उत्तर देतोय. आता 2022 आहे आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर कारवाई झाली होती. मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिली कारवाई होती. त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली. यानंतर मला अनेक लोकांनी विचारलं की तुमच्यावरील कारवाई संपली का ? मात्र, मी त्यानंतर कायदेशीर लढाई लढतोय, असं प्रताप सरनाईक म्हणाले. तर, ईडीच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.
कंगना आणि अर्णव गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई
शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून कंगना रणौत आणि अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करण्यात आली, असं प्रताप सरनाईक म्हणाले. माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. एनएसईएल म्हणजे काय हे मी तपासतोय. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिल्यानंतर मी ईडीला सहकार्य केलं आहे. गेल्या आठवड्यात ईडीची नोटीस मिळाली होती.
केंद्र आणि राज्यातील संघर्षात पहिली कारवाई माझ्यावर
विद्यार्थी नेता म्हणून मी पुढं आलेलो आहे. 1989 पासून विहंग ग्रुपची स्थापना झाल्यानंतर व्यवसायात आलो आहे. विहंग ग्रुप आणि नंतर राजकारणात आलोय. सत्ताधारी पक्षाचा मी आमदार आहे. पहिल्यांदा माझ्यावर रेड झाली. तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष सुरु आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यावर काही ठिकाणी गनिमी कावा आणि काही ठिकाणी तह केले. राजकारणात तशा प्रकारची रणनीती राबवावी लागते, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
मुख्यमंत्री पाठिशी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते माझ्या पाठिशी आहेत. 2020 ला माझ्यावर कारवाई झाल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्यायालयानं मला संरक्षण दिलं आहे. ईडीला जे प्रश्न विचारयेचे असतील ते विचारावेत, त्यांना सहकार्य करणार आहे. भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं सरनाईक म्हणाले.
इतर बातम्या:
आज Pratap Sarnaik ची प्रॉपर्टी अटॅच केली, नंतर त्यालाही अटॅच-अटक होणार, Kirit सोमय्यांचा इशारा!
आमदारांना मोफत घरे नाहीच, आमदारांना कितीला पडणार घर?; Jitendra Awhad यांनी सांगितली किंमत