“आमच्यामध्ये सगळे आलबेल”; शिवसेनेच्या आमदाराने वादावर पडदा टाकला…

उत्साहाच्या भरात काही नेत्यांकडून वाटेल तशी वक्तव्य केली जातात, तशी वक्तव्य करणे खरं तर टाळली पाहिजे असा सल्लाही त्यांनी आपल्याच मित्रपक्षातील नेत्यांना दिला आहे. 

आमच्यामध्ये सगळे आलबेल; शिवसेनेच्या आमदाराने वादावर पडदा टाकला...
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 6:24 PM

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सरकारच्या जाहिरातीबाजीवरून जोरदार वादळ उठले आहे. शिवसेना-भाजपसह विरोधकांनीही या जाहिरातीबाजीवरून सडकून टीका केली आहे. विरोधकांनी जाहिरातीच्या विषयावरून आता सरकारमध्ये बेबनाव असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे आता शिवसेनेतील नेत्यानी आमची युती भक्कम असून जाहिरातीवरून कोणतेह मतभेद नाहीत तर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या विचारानुसार आमचे सरकार योग्य प्रकारे काम करत असल्याचा विश्वासही आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या सरकारबद्दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यक्त करताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका करताना शिवसेना आणि भाजपचा वाद विकोपाला गेला असल्याची टीका केली गेली होती. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताा संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे की, वाद हे सगळीकडेच असतात. वाद नसतात कुठे सगळ्या राजकीय पक्षामध्ये वाद होत असतात.

तो वाद मिठण्यासारखा

त्यामुळे आमच्यातील हा वाद टोकाचा नाही तर तो वाद मिठण्यासारखा असल्याचे सांगत हा वादही काही दिवसात संपून जाईल असंही संजय शिरसाठी यांनी विश्वासाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या सरकारचे काम लोकांच्या पसंदीला उतरत आहे.

सर्वसामान्य माणूस युतीबरोबर

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस शिवसेना भाजप युतीबरोबर जोडला गेला आहे. त्यामुळे आता विरोधकांमध्ये नाराजी आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे विरोधकांच्या बत्त्या पेटल्या आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

हे आता वरिष्ठ नेते ठरवतील

तर जागा वाटपावरून चालेलेल्या राजकारणावरूनही संजय शिरसाठ यांनी विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. ही जागा कोणाला ती जागा कोणाला हे आपण ठरवणार आहात का? हे आता वरिष्ठ नेते ठरवतील अशा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

एकमेकांच्या हातात हात

त्यातच उत्साहाच्या भरात काही नेत्यांकडून वाटेल तशी वक्तव्य केली जातात, तशी वक्तव्य करणे खरं तर टाळली पाहिजे असा सल्लाही त्यांनी आपल्याच मित्रपक्षातील नेत्यांना दिला आहे. काही वक्तव्य केली गेली असली तरी, आमच्यामध्ये सगळे आलबेल असून शिंदे आणि फडणवीस एकमेकांच्या हातात हात घालून काम करत असल्याचेही शिरसाठ यांनी सांगितले.

शिंदेंना संधी मिळाली

ज्या प्रकारे एकाद्या व्यक्तीला संधी मिळते एकाद्या पदावर काम करण्याची जशी नरेंद्र मोदी यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांनीही जगात आपले वेगळे नाव करून दाखवले. तशीच एक सामान्य कार्यकर्ता असणाऱ्या शिंदेंना संधी मिळाली आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.