“शिवसेना सोडली त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली”; ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर आमदारांचा इतिहास सांगितला

ज्या कोकणामध्ये विकास कामं मंजूर केली होती त्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. मात्र हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेना सोडली त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली; ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर आमदारांचा इतिहास सांगितला
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 3:49 PM

मुंबईः राज्यात सत्तांतर झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यानंतर अपात्र आमदारांच्या विषयावरूनही जोरदार गदारोळ माजला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे. त्यातच आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे. त्यावरूनच आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर बोलताना त्यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारकडून महिलांवरती अन्याय अत्याचार थांबतील असं कोणतही विधान करण्यात येत नाही. दिल्लीतील कुस्तीपटू बघा महिनाभरापासून उपोषण करतात त्यांना न्याय मिळत नाही असा घणाघात त्यांनी केंद्रावर केला आहे.

त्यातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून वारंवार बेताल वक्तव्य केली जात होती, त्यातच ते मित्र पक्षाचे आमदार असल्यामुळे आता शिरसाठ यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार नाही हे आधीपासूनच ठाऊक होतं आणि म्हणूनच आम्ही आवाज उठवत होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुषमा अंधारे या ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची त्यांची वाळू सरकलेली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे याआधीसुद्धा काही आमदार घेऊन नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती, पण त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली त्यांच्यासोबत जे आमदार गेले. ते इतिहासात जमा झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते देखील इतिहास जमा होतील असा इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे.

यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले की, ज्या कोकणामध्ये विकास कामं मंजूर केली होती त्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. मात्र हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल.
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी.
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर.
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ.
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.