‘त्यांचा जीव उद्धव ठाकरे यांनी वाचवला, पण यांची निष्ठा म्हणजे विष्ठा’, अरविंद सावंत यांची किरण पावसकर यांच्यावर खोचक टीका

"किरण पावसकर यांना कोणी वाचवलं? ज्यांनी वाचवलं त्यांच्याबद्दल बोलताना यांची जीभ झडत कशी नाही? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं", अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

'त्यांचा जीव उद्धव ठाकरे यांनी वाचवला, पण यांची निष्ठा म्हणजे विष्ठा', अरविंद सावंत यांची किरण पावसकर यांच्यावर खोचक टीका
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 8:09 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरण पावसकर यांना त्यांच्या कठीण प्रसंगामध्ये साथ दिली. पण त्यांना त्याची जाणीव राहिली नाही, असा दावा अरविंद सावंत यांनी केला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला डम्पिंग ग्राउंड म्हणत खोचक टीका केली. “किरण पावसकर यांना उद्धव ठाकरे यांनी वाचवलेलं आहे. त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा एक तज्ज्ञ डॉक्टर शोधून आणून त्यांची सर्जरी केली. कोणी वाचवलं? उद्धव ठाकरे यांनी वाचवलं”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

“किरण पावसकर यांना उद्धव ठाकरे यांच्या मदतीची जाण नसेल तर त्यांच्या पत्नीला विचारा. त्यांच्या कुटुंबीयांना विचारा, किरण पावसकर यांना कोणी वाचवलं? ज्यांनी वाचवलं त्यांच्याबद्दल बोलताना यांची जीभ झडत कशी नाही? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

“किरण पावसरकर यांना शिवसेनेबद्दल बोलायचा नैतिक अधिकार देखील नाही. त्यांची स्वतःची जगण्याची धडपड सुरू आहे. ते शिवसेनेत होते, शिवसेनेच्या भारतीय कामगारांचे सरचिटणीस होते. मग गपचूप पळून राष्ट्रवादीत गेले. आता राष्ट्रवादीतून निघाले मिंदे गटाकडे. धडपडत कोण आहे, आम्ही का तुम्ही? धडपडत 50 ठिकाणी कोण जातंय?”, असे सवाल त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

“यांची निष्ठा नाही, यांची निष्ठा म्हणजे विष्ठा आहे. जो मिंदे गट म्हणजे डम्पिंग ग्राउंड असतो ना, कचऱ्याचा कचरा डम्पिंगमध्ये आलेला असतो, जो कचरा समाजाने टाकून दिला पाहिजे होता तो बरोबर झालं, शिवसेनेत जमा झालेला कचरा चला डम्पिंग ग्राउंडमध्ये गेला”, असा घणाघात अरविंद सावंत यांनी केला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.