मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा, 21 गुजराती व्यावसायिक शिवसेनेत

मुंबई मा जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपाडा अशी घोषणा देत भाजपाला आवाहन दिले.(Shivsena organised Gujarati community melava in mumbai)

मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा, 21 गुजराती व्यावसायिक शिवसेनेत
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 10:38 PM

मुंबई : येत्या 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे गुजराती समाजाचा मेळावा संपन्न झाला झाला. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराजभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्पेश मेहता यांच्या पुढाकारातून मालाडमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात गुजराती समाजाच्या 21 व्यावसायिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई मा जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपाडा अशी घोषणा देत भाजपाला आवाहन दिले आहे. (Shivsena organised Gujarati community melava in mumbai)

गुजराती समाजाच्या मेळाव्यात माजी आमदार हेमेंद्र मेहता, शिवसेना राष्ट्रीय संघटक हेमराज शहा, मुंबई महापालिकेच्या शिक्षण सभापती संध्या दोशी, नगरसेविका राजुलबेन पटेल, मुंबई व्यापारी असोसिएशनचेचे अध्यक्ष विरेन लिंबाचीया, संयोजक कल्पेश मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रात भाजपाच्या हातातील सत्ता शिवसेनेने खेचून आणली. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष वेळोवेळी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुजराती समाज शिवसेनेच्या बाजूने वळविण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराजभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेही कंबर कसली आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपाचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला. आज पुन्हा मुंबई मालाडच्या काचपाडा येथील B2B अग्रवाल बिझनेस सेंटरमध्ये शिवसेनेच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला.

“भाजपने कितीही वल्गना केली तरी शिवसेनेचाच महापौर होणार” 

यावेळी 21 गुजराती व्यावसायिकांना शिवसेना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच शिवसेना हा सर्व समाजाचे नेतृत्व करणारा पक्ष असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दंगलीत केवळ शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईतील गुजराती व्यावसायिकांचे व्यवसाय टिकले आहेत. भाजप केवळ राजकीय द्वेष्ट्यापोटी राजकारण करत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला. तसेच येणाऱ्या महापालिकेत भाजपाने कितीही वल्गना केली तरी शिवसेनेचाच महापौर होणार असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यात गुजराती समाजाचे आकर्षण असणाऱ्या गरब्याचे आयोजन केले होते. गरबा फेम गायिका प्रीती-पिंकी, भूमी त्रिवेदी, विश्वजित सोनी, किशोर भानुशाली, उर्वशी सोळंकी हे गुजराती कलाकार या मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रीती-पिंकी यांच्या बहारदार गाण्यातून गरबा ही खेळण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गुजराती समाजाला आकर्षण वाटवे म्हणून याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी गायकांनी मराठी गण्यावरही गरबा केला.  (Shivsena organised Gujarati community melava in mumbai)

संबंधित बातम्या : 

आभा पांडे आजच राष्ट्रवादीत, पालिकेतून थेट विधानसभेत नेण्याचा अजित पवारांचा शब्द?

शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.