आरोग्यमंत्र्यांच्या दालनातच शिवसेना आमदाराला चक्कर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनात बसलेलं असतानाच कळंबचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं.

आरोग्यमंत्र्यांच्या दालनातच शिवसेना आमदाराला चक्कर
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 8:24 AM

उस्मानाबाद : उस्मानाबादमधील शिवसेना आमदार कैलास पाटील यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनातच चक्कर आली. जनतेच्या कामासाठी मंत्रालयातील विविध दालनात जाऊन धावपळ केल्याने कैलास पाटील यांची तब्येत बिघडली (Shivsena MLA Health Deteriorated) होती. सुदैवाने पाटील यांच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे.

मतदारसंघातील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी कळंबचे आमदार कैलास पाटील यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जावं लागलं. अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करताना सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण करण्यासही राहून गेलं. त्यामुळे कैलास पाटलांना उपवास तर घडलाच शिवाय थकवाही जाणवत होता.

दुपारच्या सुमारास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनात बसलेलं असतानाच कैलास पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. पाटलांना दरदरुन घाम फुटल्याचं पाहून आरोग्यमंत्र्यांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांना तात्काळ बैठकीच्या रुममध्ये नेण्यात आलं आणि सरकारी डॉक्टरांना बोलवण्यात आलं.

शारीरिक आणि मानसिक तणावामुळे कैलास पाटील यांना थकवा आल्याची माहिती आहे. कैलास पाटील यांची तब्येत ठीक असून वैद्यकीय चाचणीनंतर ते मंत्रालयातील विकास कामासाठी पुन्हा सक्रियही झाले. त्यानंतर ते आपला मतदारसंघ कळंबला रवाना होणार असल्याचीही माहिती (Shivsena MLA Health Deteriorated) आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.