Eknath Shinde : बंडाची ठिणगी नेमकी कधी आणि कुठे पडली? दीपक केसरकरांनी ज्वालामुखीचा पॉईंट सांगितला
कोकणातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, मी राष्ट्रवादीत असल्यापासून माझे सर्वांबरोबर चांगले संबंध आहेत. माझे चांगले संबंध असले तरी राष्ट्रवादीबाबत शिवसेनेचे सगळे नेते माझ्याकडे तक्रार करत होते की, 2 नंबरच्या पक्षाला महत्त्व दिलं गेलं आहे.
मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result 2022) शिवसेनेचे नेत, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय युद्धाचा वणवा पेटला, तो थांबता थांबत नाही आहे. घटक पक्षातील आमदार फुटण्याऐवजीच शिवसेनेचे आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला. बंडखोरीनाट्यानंतर व दीर्घ कालवाधीनंतर कोकणातील आमदार दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) यांनी माध्यमांसमोर येत शिवसेना आणि बंडखोर आमदारांविषयी आपली भूमिका सांगितली. शिवसेना आणि बंडखोर आमदारांबद्दल माध्यमांनी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ही खरी ठिणगी ही राज्यसभेच्यावेळीच (Rajyasabha) पडली आहे. त्याचवेळी नाराजी नाट्याला सुरुवात झाल्याचेही आमदार दीपक केसरकरांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, आम्ही कोणतीही संघटना तोडत नाही, जे काल होतं, ते आजही आहे. आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो. त्यांच्याविरोधात आम्ही काहीही बोलणार नाही असं सांगत त्यांनी आपली उद्धव ठाकरेंविषयी आपले मत व्यक्त केले.
राष्ट्रवादीबाबत शिवसेनेच्या तक्रारी
कोकणातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, मी राष्ट्रवादीत असल्यापासून माझे सर्वांबरोबर चांगले संबंध आहेत. माझे चांगले संबंध असले तरी राष्ट्रवादीबाबत शिवसेनेचे सगळे नेते माझ्याकडे तक्रार करत होते की, 2 नंबरच्या पक्षाला महत्त्व दिलं गेलं आहे. राष्ट्वादीच्या नेत्यांना मोठं केलं जात आहे. त्याचवेळी उद्धव साहेबांनी योग्यवेळी हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उद्धव ठाकरे यांना पूर्वीपासून सांगतोय
कोकणातून मी आमदारीकीसाठी लढत असलो तरी मला त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातून बोलावणं आले होते मात्र गेलो नाही. त्यामुळे प्रारंभीपासून मी उद्धव ठाकरे यांना पूर्वीपासून सांगत आहे की, तुम्ही आणि भाजप एकत्र राहिले पाहिजे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र चालतात, एकत्र काम करतात, तेव्हाच महाराष्ट्र मोठा होतो. जर तुम्हाला राज्यातील लोकं त्रास देत होती, तर ती गोष्ट पंतप्रधानांकडे बोलता आली असती असं सांगत त्यांनी पंतप्रधानांना मातोश्रीबद्दल जिव्हाळा असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय राऊतांबरोबर माझा संबंध येत नाही
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या बोलताना सांगितले की, संजय राऊत फायरी आहे, त्यांच्या बोलण्याने आग लागते. ते विधीमंडळाचे सदस्य नाही त्यामुळे मी त्यांच्याशी माझा संबंध येत नाही त्यांच्याबद्दल माझा आदर असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेकडे बोट दाखवत होते
मुख्यमंत्रीपद घेऊन जर शिवसेना संपणार असेल, तर आम्हीही विरोध करणारच. विकासाची कामं करुन शिवसेना मोठी होणार आहे. जेव्हा विरोधात शिवसेना होती तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, मात्र आता शिवसेना सत्तेत आहे. ही ठिणगी पडली राज्यसभेवेळी फुटली होती असं सांगत शिवसेनेची मतं फुटली नव्हती मात्र लोक शिवसेनेकडे बोट दाखवत होते, शिवसेनेच्या लोकांनी वेगळीकडे मतदान केलं, त्यामुळे ही वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.