Shivsena: माहिमममध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने; गद्दार शब्दामुळे वाद विकोपाला
शिवसेनेचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य आणि शाखाप्रमुख मिलिंद तांडेल यांच्यात वाद झाला आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षाकडून त्यांची पदं काढून घेतली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांच्या निकटवर्तीय लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यावरुनच दादर माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्येच राडा झाला आहे.

मुंबई: शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे (Shivsena) सरकार कोसळल्यानंतर कट्टर शिवसैनिकांमध्ये आता बंडखोर आमदारांविषयी टोकाची भावना होत आहे. बंडखोरीपासूनच मुंबईतून पोस्टरबाजीवरूनच जोरदार वाद व्हायला सुरूवात झाली होती. त्यामुळे पुन्हा बंडखोर आमदारांप्रमाणेच (Rebel MLA) शिवसेनेच्या खासदारांनीही आपली भूमिका मांडल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच माहिम परिसरातील असलेल्या शिवसेना शाखा क्रमांक 182 (Shivsena Shakah No. 182)मध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आले. त्यामुळे वाद होत असतानाच शाखेजवळ पोलीस आल्याने हा वाद विकोपाला गेला नाही.
यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य आणि शाखाप्रमुख मिलिंद तांडेल यांच्यात वाद झाला आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षाकडून त्यांची पदं काढून घेतली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांच्या निकटवर्तीय लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यावरुनच दादर माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्येच राडा झाला आहे.
वैद्य आणि तांडेल यांच्यात वाद
माजी नगरसेवक मिलिंद वैद्य आणि शाखाप्रमुख मिलिंद तांडेल यांच्यात हा वाद झाला असून काहीनी मध्यस्ती केल्याने वाद चिघळला नाही. सदा सरवणकर हे नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बॅनर आणि पक्षाच्या विचारावरून समर्थकांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना शाखेवर बॅनरवर सदा सरवणकर यांच्या फोटोवर गद्दार असे लीहण्यात आले होते, त्यामुळे त्या बॅनरला काढण्याचा प्रयत्न झाल्याने हा वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदारांवर आता कारवाई
शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर आता कारवाई करण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे आमदार संतोष बांगर यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करत त्यांना हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. तरीही संतोष बांगर यांनी अशा कारवाईना मी घाबरत नाही, आणि नोटीसीला दाद देत नसल्याचे सांगत त्यांना आपण कडवट शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे. तसेच ते उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन करत ते एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेने आता बंडखोरांवर कारवाईचे अस्र उगारल्यामुळे आप्तस्वकीय नाराज होत असल्याने हे वाद विकोपाला जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा सोळा आमदारांबाबतचा निर्णयही पुढे ढकलल्याने शिवसैनिकांमधून राग व्यक्त केला जात आहे.