Eknath Shinde : आम्हाला नाही, ठाकरेंसोबत उरलेल्या 14 आमदारांना विलीन व्हावं लागले, राष्ट्रवादी त्यांना जवळची आहे, केसरकरांचा घणाघात

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी (Shivsena Rebel MLA) करून मुंबई, सूरत आणि गुवाहाटी असा प्रवास करणाऱ्या आमदारांविषयी आता थेट कारवाईची भाषा केली जाऊ लागली आहे. ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, किंवा जे नेते वेगळ्या गटाची भाषा करत आहेत, त्यांनी प्रहार संघटना (Prahar Sanghtana) किंवा भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही असा सल्लाही शिवसेनेचेन नेते संजय […]

Eknath Shinde : आम्हाला नाही, ठाकरेंसोबत उरलेल्या 14 आमदारांना विलीन व्हावं लागले, राष्ट्रवादी त्यांना जवळची आहे, केसरकरांचा घणाघात
आम्हाला नाही तुम्हाला 14 आमदारांना घेऊन तुम्हाला विलीन व्हावं लागणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 8:33 PM

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी (Shivsena Rebel MLA) करून मुंबई, सूरत आणि गुवाहाटी असा प्रवास करणाऱ्या आमदारांविषयी आता थेट कारवाईची भाषा केली जाऊ लागली आहे. ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, किंवा जे नेते वेगळ्या गटाची भाषा करत आहेत, त्यांनी प्रहार संघटना (Prahar Sanghtana) किंवा भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही असा सल्लाही शिवसेनेचेन नेते संजय पवार, मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बंडखोर आमदारांना आता विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यानंतर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या प्रतिक्रियेवर त्यांनी सांगितले की, आम्हाला नाही, ठाकरेंसोबत उरलेल्या 14 आमदारांना विलीन व्हावं लागले आणि त्यांना राष्ट्रवादी हा पक्षच जवळचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यांविषयी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. संजय राऊत एवढी टोकाची भाषा करत असतील पक्षप्रमुख आणि घटनात्मक प्रमुख असताना त्यांना हे मान्य आहे का असा सवालही दीपक केसरकर यांनी केला.

राष्ट्रवादी हा पक्षच त्यांना जवळ

यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितले की, बंडखोर आमदारांची संख्या आता शिवसेनेतील आमदारांपेक्षा जास्त असून शिंदे गटाच्या आमदारांना विलीन व्हावे लागणार नाही तर जे उरलेले 14 आमदार आहेत. त्यांनाच आता कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल असंही त्यांनी सांगितले. आणि जे 14 शिवसेनेचे आमदार राहिले आहेत त्यांना राष्ट्रवादी हा पक्षच त्यांना जवळ असल्याचे सांगितले.

 प्रहार संघनेत विलीन व्हावं लागणार

शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्यापासून त्यांच्यावर टीका आणि कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याचे बरोबर शरद पवार, संजय राऊत आणि आता आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविषयी म्हटले आहे की, ज्यांनी कोणी बंडखोरी केली आहे. त्यांना आता भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन केल्याशिवायही पर्याय नाही. त्या प्रतिक्रियेवर मत व्यक्त करताना आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आता शिंदे गटाकडे आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची संख्या खूप आहे, त्यामुळे आम्हाला नाही तर शिवसेनेतील जे 14 आमदार राहिले आहेत त्यांनाच आता विलिन व्हावे लागणार असल्याचे मतही आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही

गेल्या काही दिवसांपासून चालत  असलेल्या राजकीय नाट्यविषयी आता अफवा पसरत असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. विलीन होण्याच्या प्रश्नांवर त्यांनी सांगितले की, शिवसेनेतीलच लोकप्रतिनिधीच विचार करून आमच्यासोबत यायच की दुसऱ्या पक्षात विलीन व्हायच हे त्यांनीच ठरवलं पाहिजे असंही दीपक केसरकरांनी सांगितले आहे. आमच्याकडे एकूण 46 आमदार असल्याने थोड्याच दिवसात हे चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.