शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा, अन्नदान करा, शिवसेना आमदाराकडून आवाहन
येत्या काही दिवसांत भायखळ्यात आणखी आठ ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. (Shivsena started Community fridge Facility at Byculla)
मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गरजूंना मदत करण्यासाठी कम्युनिटी फ्रिजची संकल्पना सुरु केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव येथे बाप्टिस्टा उद्यानाबरोबरच शिवसेना शाखा 209 मध्ये हा उपक्रम आता सुरु झाला आहे. येत्या काही दिवसांत भायखळ्यात आणखी आठ ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. (Shivsena started Community fridge Facility at Byculla)
शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. “नॅश फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझगांव कोर्टशेजारील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी कम्युनिटी फ्रिजची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नुकतंच या कम्युनिटी किचनचा शुभारंभ करण्यात आला.
गोरगरीब आणि गरजूंना मोफत अन्न मिळावे, या पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी भायखळा शिवसेना आणि नेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी फ्रिज ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेनुसार येत्या काही दिवसात आणखी आठ ठिकाणी कम्युनिटी फ्रिज म्हणजेच माणुसकीचा फ्रिज” हा उपक्रम सुरू करणार येणार आहे, असे यामिनी जाधव यांनी सांगितले.
माझगाव येथील बाप्टिस्टा उद्यानात कम्युनिटी फ्रिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्याकडील अन्न नागरिकांनी या कम्युनिटी फ्रिजमध्ये ठेवायचे. त्या फ्रिजचा गरजू लोकांनी लाभ घ्यायचा, अशी ही संकल्पना आहे.
हा उपक्रम गोरगरिबांसाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील अन्न या कम्युनिटी फ्रिजमध्ये दान करावे. ज्याचा गोरगरिबांना लाभ होईल, असे आवाहन आमदार यामिनी जाधव यांनी केले.(Shivsena started Community fridge Facility at Byculla)
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत.दादरच्या शिवाजी पार्कचे नामकरण “छत्रपती शिवाजी महाराज पार्क” असे करण्यासाठी @iYashwantJadhav साहेब यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.
धन्यवाद यशवंत जाधव साहेब.@OfficeofUT @AUThackeray @AGSawant @KishoriPednekar @AshishChemburk1 pic.twitter.com/G9cWeyGaHN
— Yamini Yashwant Jadhav (@YaminiYJadhav) November 16, 2020
संबंधित बातम्या :
मुंबईकर तरुणांनो, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली