“…त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन”, उद्धव ठाकरे कडाडले

तुमचे पाठबळ नसते तर मी उभा राहू शकलो नसतो. सर्व ओरबाडून घेतल्यानंतर फक्त तुम्ही आणि तुम्हीच आई जयदंबेसारखं माझ्यासोबत उभे राहिलात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

...त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन, उद्धव ठाकरे कडाडले
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 8:29 PM

Uddhav Thackeray Dasara Melava 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढ्या यायच्या तितक्या येऊ द्या, मी इथे त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

“प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात. कुणाकडे तलवार आहे. कुणाकडे मशीनगन आहे. पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. अेक वर्षाच्या परंपरेने ठाकरे कुटुंबीयाने जी शस्त्रपूजा केली. त्यात इतर शस्त्र आहेत, पण शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्याने फटकारे मारले आणि मनगटात ताकद दिली. त्या कुंचल्याची पूजा केली. आता तुमची पूजा करत आहे. तुम्ही शस्त्र आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही लढाई साधी नाही. एका बाजूला बलाढ्य अब्दाली सारखी माणसं आहेत, केंद्राची सत्ता आहे. शासकीय यंत्रणा आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तानभूत करायचे हे त्यांनी ठरवलेले आहे. पण ही फक्त शिवसेना नाही तर ही वाघनखं आहेत जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहेत. तुमचे ऋण या जन्मात फेडू शकत नाही. तुमचे पाठबळ नसते तर मी उभा राहू शकलो नसतो. सर्व ओरबाडून घेतल्यानंतर फक्त तुम्ही आणि तुम्हीच आई जयदंबेसारखं माझ्यासोबत उभे राहिलात. त्यामुळे मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढ्या यायच्या तितक्या येऊ द्या, मी इथे त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

आजपासून प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांची मशाल बनून या सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही. उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं दुर्मीळ झालं. टाटांसारखे उद्योगपती विरळ असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या. आपल्या जेवणातील लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. आजचे उद्योगपती मिठागरे गिळत आहे. टाटा गेल्याचं दुख वाटतं. आणि मिठागरे गिळणारे जात का नाही याचं वाईट वाटतं. जे जायला पाहिजे ते जात नाही, जे जाऊ नयेत ते जात आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

मला संघाबद्दल, भागवत यांच्याबद्दल आदर आहे. पण ते जे काही करत आहेत. त्याचा आदर नाही. तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या कुणाबद्दल सांगत आहात. तुम्ही म्हणता हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. मग दहा वर्षापासून विश्वगुरू बसलाय. अजून संरक्षण नाही करू शकला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.