फाईली इकडून तिकडे जात होत्या…; ठाकरे गटाच्या नेत्याने मंत्रिपदावरून अजित पवारांना डिवचलं
Sachin Ahir on Ajit Pawar Group and Narendra Modi Oath Ceremony : ठाकरे गटाच्या नेत्याने अजित पवारांना डिवचलं आहे. आज मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र यात अजित पवार गटाला अद्यापतरी फोन आलेला नाही. यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने टोला लगावला आहे. वाचा...
नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार गटाला फोन आलेला नाही. यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी भाष्य केलंय. अजित पवार गटाला मंत्रिपद देण्यासाठी वाद हा भाजपमध्ये आहे. पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्या ठिकाणी जाऊन बसावं लागत होतं. गेल्या दोन दिवसात फाईली इकडून तिकडे जात होत्या. त्यातून स्पष्ट होत होतं की प्रफुल पटेल यांना संकेत दिलेले मात्र दिले नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
सामना अग्रलेखावर काय म्हणाले?
सामना अग्रलेखात पक्षाने रोखठोक भूमिका मांडली हम करे सो मत्रिमंडळ हम करे सो मंत्र्यांना संधी… आता अनेक तडजोड करावी लागणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर शिंदे गटाची शिवसेना असेल अजित पवार गट यांच्याशी तडजोड सुरू आहे. अजित पवार गटाला अजून काही मिळाली नाही इतका मोठा पक्ष असून मंत्रिपद मिळत नाही, यासाठी अग्रलेखातून आमची भूमिका मांडली, असंही सचिन अहिर म्हणाले.
अहिर काय म्हणाले?
देशभरात विरोधी अभावी असणारी टक्केवारी मोठी आहे. देशात हे ज्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याला कुठल्याही प्रकारे अनु देणार नाही ही भूमिका मतदारांनी त्यांना दिलेली आहे. भविष्यात असंख्य संकटाला निर्णय घेत असताना लोकांकडून त्यांना विरोध होणार आहे. बहुमताच्या जोरावर सगळं रेटून घ्यायचं जे पूर्वी सुरू होतं ते आता होणार नाही. देशात 60 टक्के लोकांनी त्यांना नाकारलं. त्यामुळे त्यांना काही करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी बघून करावे लागणार आहे, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
श्रीकांत शिंदे यांची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून असेल तर ठीक आहे. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद घ्यायची इच्छा असेल तरी त्यांच्या आपसात जे मतभेद आहेत. प्रतापराव जाधव याना मंत्रीपद मिळालं ते सर्व आलबेल आहे. काही दिवसांनी वेगवेगळे आणि दिल्लीत असेलेले खासदार याच्या प्रतिक्रिया काही दिवसात कळेल… त्यांना दिलेले आश्वासन कशाप्रकारे याचे चर्चा सगळ्यांसोबत पाहायला मिळणार आहे, असं सचिन अहिर म्हणाले.