मुख्यमंत्रिपद आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले…
Sanjay Raut on Eknath Shinde and Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव घेत संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला बहुमत मिळालं आहे. असं असताना मुख्यमंत्रिपदाबाबत निश्चितता नाही. कोण मुख्यमंत्री होणार? याची स्पष्टता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. तर एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यात मला रस नाही. मुख्यमंत्री कोण होणार, हे माहाराष्ट्रातील आमदार नाही तर दिल्लीत बसलेले अमित शाह आणि नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. भाजपकडे स्वत: चं बहुमत आहे. त्यामुळे मला वाटतं की भाजपचा सरकार स्थापन करण्याचा हक्क आहे. तोच राहील असं मला वाटतंय, असं संजय राऊत म्हणालेत.
अडीच- अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर राऊतांचं भाष्य
2019 ला आम्ही जेव्हा अडीच- अडीचचा फॉर्म्युला सांगत होतो. तेव्हा अडीच वर्षांचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. जर तेव्हा आमचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला मान्य केला असता. तर पुढच्या घडामोडी टळल्या असत्या. पण शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचा होता. शिवसेना फोडायची होती. म्हणून तेव्हा अडीच- अडीच वर्षांचा फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते सगळंकाही करायला तयार आहेत. यातून लक्षात येतं की महाराष्ट्राविषयी आणि शिवसेनेविषयी या लोकांच्या मनात किती द्वेष आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
अनेक अधिकारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पण रेवंथ रेड्डी यांना अधिकारी भेटले तर त्यांच्यावर कारवाई होतेय, असं राऊत म्हणालेत.
भाजपकडे बहुमत आहे आणि जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर ते बहुमत कसं मिळवायचं कोणाला तोडायचं आहे कोणाला खरेदी करायचं आहे हे त्यामध्ये ते माहिर आहेत. बहुमतासाठी सुद्धा ते शिंदे यांची पार्टी तोडू शकतात आणि अजित पवारांची पार्टी देखील तोडू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री हे भाजपचेच व्हायला पाहिजे…, असं राऊतांनी म्हटलं आहे.