ठाकरेंच्या दुसऱ्या उमेदवार यादीत लाडक्या बहिणींचा बोलबाला, ‘त्या’ जागेवर कोण?
Shivsena Thackeray Group Candidate List : उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या यादीत लाडक्या बहिणींचा बोलबाला पाहायला मिळतो आहेत. 15 उमेदावांच्या नावांची घोषणा ठाकरेंनी केली आहे. यात अधिकाधिक महिलांना उमेदवारी दिल्याचं दिसतं आहे. कुणा- कुणाला संधी? वाचा सविस्तर बातमी...
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. यात 15 उमेदवारांच्या नावची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत महिलांना अधिकाधिक संधी ठाकरे गटाने दिल्याचं दिसत आहे. 15 जणांच्या उमेदवार यादीत 5 महिलांना संधी दिल्याचं दिसत आहे. तर मुंबईतील सातत्याने चर्चेत असणऱ्या शिवडीच्या जागेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटातच रस्सीखेच सुरु होती. या जागेवरून सुधीर साळवी आणि अजय चौधरी हे इच्छुक होते. आता जाहीर झालेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत शिवडीच्या जागेवरून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत कुणाला संधी
ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 15 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसांआधी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनिल गोटे यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे. धुळे शहरमधून त्यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीसोबत रस्सीखेच सुरु असलेल्या श्रीगोंद्याच्या जागेवर अनुराधा नागावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पाच महिलांची नावं जाहीर
ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत पाच महिलांना संधी देण्यात आली आहे. जळगाव शहरमधून जयश्री महाजन, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्री शेळके, हिंगोलीतून रूपाली पाटील, वडाळ्यामधून श्रद्धा जाधव, श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
एकूण 15 उमेदवारांचा शिवसेना ठाकरे गटाच्या दुसरे यादी समावेश
१) धुळे शहर- अनिल गोटे
२)चोपडा (अज)- राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
४) बुलढाणा- जयश्री शेळके
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली (अजा) योगेश घोलप
९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२ )शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४)श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५)कणकवली- संदेश भास्कर पारकर