मविआतील नाराजी टोकाला; मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, तर आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला

Mahavikas Aghadi Dispute : मविआतील नाराजी टोकाला गेला आहे. काल महाविकास आघाडीची 10 तास बैठक झाली. तरी हा वाद मिटलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. अशातच आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेलेत. मविआत काय घडतंय? वाचा सविस्तर...

मविआतील नाराजी टोकाला; मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, तर आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , शरद पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 1:54 PM

आजपासून बरोबर एक महिन्याने माहाराष्ट्रात विधानसभेचं मतदान पार पडणार आहे. पण असं असताना अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप झालेलं नाही. अद्याप काही जागांवर रस्सीखेच सुरु आहे. विदर्भातील काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंनी बोलावली बैठक

‘तुटेल इतकं ताणू नये’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगूनही काँग्रेस- ठाकरे गटातील वाद मिटत नाहीये. जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी बैठकीसाठी संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई आणि वैभव नाईक मातोश्रीवर पोहोचले आहेत. मिलिंद नार्वेकर, राजन विचारे मातोश्रीवर बैठकीसाठी दाखल झालेत. ही बैठक आता सुरु होत आहे.

आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला जात आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटायला आलो, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मात्र काँग्रेस- शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही भेट घेतल्यांचं समजतं आहे.

नेमका वाद काय?

परवा दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन नेत्यांमध्ये विदर्भातील जागांवरून मतभेद झाले. नाना पटोले असतील तर जागा वाटपाच्या चर्चेत आम्ही उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली. त्यानंतर आता हे वाद विकोपाला गेले आहेत.

Non Stop LIVE Update
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका.
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा.
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?.
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला.
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.