शिवसेना vs भाजप… शिवसेनेचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, तर भाजप वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक
शिवसेना केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार आहे. तर भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : आज राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसणार आहे (Shivsena Vs BJP Morcha). कारण, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आज वेगवेगळ्या विषयांवर आंदोलनं करणार आहेत. शिवसेना केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार आहे. तर भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे (Shivsena Vs BJP Morcha).
सध्या देशात पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शिवसेना आज राज्यभर मोर्चे काढणार आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे.
शिवसेनेचं म्हणणं काय?
पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका उडेल. या चिंतेने जनतेत केंद्र शासनाच्या विरोधात असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरीकांच्या पाठीशी उभी असून महागाईच्या या भडकणाऱ्या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात त्त्रीव आंदोलन छेडण्यात येणार आहे, असं शिवसेनेने म्हटलं.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ ऑपेरा हाऊस येथे सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहे.
भाजपचं ठाकरे सरकारविरोधात आंदोलन
भाजप वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झाली आहे. भाजपने ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडलं आहे. “महाराष्ट्रात ज्या प्रकारे लोकांना वीज बिलाचे कनेक्शन तोडण्याच्या नोटिस राज्य सरकारने दिल्यात. ते पाहता राज्यात मोगलाई आलीये”, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शनं करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आज 11.30 वाजता महावितरण कार्यालय भांडुप पश्चिम येथे टाळे ठोको आंदोलनात मी भाग घेणार आहे. 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवणाऱ्या महावितरणचा विरोधात टाळा ठोको, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली (Shivsena Vs BJP Morcha).
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद घेत या आंदोलनाची माहिती दिली होती. “महाविकास आघाडीच्या सरकारे 72 लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय हा मोगलाई आहे. आधी 100 युनिट माफ करणार असं सांगितलं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झाल, फक्त वाहवा मिळवून वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही तर मग ही लोक पैसे कसं भरणार. 72 लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे.”
“जर कुणी जबरदस्ती असं करेल तर भाजप याचा जोरदार विरोध केला जाईल. राज्यभरात टाळे लावा आंदोलन करणार. फडणवीस सरकारच्या काळात एकाही शेतकऱ्याची वीज तोडली नाही. इतक्या कठीण काळात शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी अडचणी उभ्या केल्या जात आहेत. उर्जामंत्र्यांनी पाठवलेली फाईल पुढे गेलीच नाही, याचा कुठेतरी काँग्रेसला याचा फायदा होऊ नये याची काळजी घेतली गेली, म्हणूनच अजित पवारांनी ही फाईल मंजुर केली नाही. जर मागच्या सरकारने काही चुकीच केलं असेल तर सिद्ध करा आणि श्वेतपत्रिका काढा”, असं म्हणत माजी उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलं.
‘सत्ताधाऱ्यांची जुमलेबाजी देशाला…’, पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/ghSBiw3ie6@OfficeofUT @rautsanjay61 @BJP4India #PetrolPriceHike #PetrolDiesel
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2021
Shivsena Vs BJP Morcha
संबंधित बातम्या :
उपमुख्यमंत्रीपदाची मागणी कुठून आली माहित नाही, पण एकत्र बसून चर्चा करु-काँग्रेस मंत्री
राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी : देवेंद्र फडणवीस