मुंबईतल्या अरबी समुद्राचं असं रुप जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल, सर्वाधिक पाहिला जाणारा Video

तौक्ते चक्रीवादळाच्याथैमानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हयरल होत आहे. (tauktae cyclone mumbai gateway of india)

मुंबईतल्या अरबी समुद्राचं असं रुप जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल, सर्वाधिक पाहिला जाणारा Video
mumbai tauktae cyclone
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 11:25 PM

मुंबई : महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईमध्ये तर या वादळाचे रौद्र रुप पाहायला मिळतेय. तौक्ते चक्रीवादळाच्या थैमानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. वादळामुळे अरबी समुद्राचं खवळलेलं रुप पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. (shocking visuals of Tauktae cyclone from Mumbai gateway of India video goes viral)

खवळलेल्या अरबी समुद्राचा व्हिडीओ ?

तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सध्याची परिस्थिती विषद करणारे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. अरबी समुद्राचे खवळलेले रुप दाखवणारा असाच एक व्हिडीओ विशेष म्हणून पाहिला जातोय. हा व्हिडीओ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील चक्रीवादळाची स्थिती सांगतो आहे. समुद्रातील पाणी थेट गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्यावर आदळत आहे. हा व्हिडीओ ताज हॉटेलमधून शूट करण्यात आला असून त्याला मोठ्या संख्येने पाहिले जात आहे.

पाहा व्हिडीओ :

मुंबईमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने कालपासून धुमाकूळ घातला आहे. मुंबईत ताशी 114 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. सोमवारचं दिवसभरातील हे सर्वात मोठं आणि भयंकर असं वादळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले आहे. कोणताही अनर्थ ओढवू नये म्हणून मुंबईत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात असून राज्यभरात एकूण 12 टीम तैनात आहेत.

इतर बातम्या :

Mumbai rains and weather update : मुंबईत 24 तासात अतिवृष्टीची शक्यता, 120 किमी वेगाने वारं वाहणार

Cyclone in Mumbai: मुंबईत डेंजर वारा, पावसाचा मारा, विमान-लोकल सेवा ठप्प, राज्यात 6 जण दगावले; धोका अजून कायम!

Tauktae Cyclone Live: तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा उद्धव ठाकरेंकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

(shocking visuals of Tauktae cyclone from Mumbai gateway of India video goes viral)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.