म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा मोठा तुटवडा, रोज 20 हजार इंजेक्शन्सची गरज, केंद्राकडून पुरवठा फक्त 5 हजार!
राज्यात म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. तशी माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची लाट काहीशी ओसरत असल्याचं चित्र असलं तरी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत राज्यात म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. तशी माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यात एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचे दररोज 20 हजार डोस लागत आहेत. अशावेळी केंद्र सरकारकडून फक्त 5 हजार इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचं शिंगणे यांनी म्हटलंय. (Shortage of amphotericin b injection on mucormycosis in Maharashtra)
राज्यात कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार 914 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 421 रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालाय. म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत. नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 1 हजार 59 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापठोपाठ पुण्यात 758, तर औरंगाबादेत 571 रुग्ण असल्याची माहितीही राजेंद्र शिंगणे यांनी दिलीय.
‘रेमडेसिव्हीर’ पाठोपाठ वर्ध्यात ‘एम्फेटेरेसिन बी’ इंजेक्शनचीही निर्मिती
रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये आता एम्फेटेरेसिन बी हे इंजेक्शनही तयार केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने वर्ध्यातील कंपनीला ही परवानगी दिली आहे. तशी माहिती कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. येत्या 15 दिवसात हे इंजेक्शन बनवण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं त्यांनी 14 मे रोजी सांगितलं होतं.
कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिस हा जिवघेणा आजार होत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 1 हजार 500 च्या आसपास पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यावेळी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या दिल्या जाणाऱ्या एम्फेटेरेसिन बी इंजेक्शनबाबत टोपे यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये या इंजेक्शनची निर्मिती होणार असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार
म्युकरमायकोसिस या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या योजनेद्वारे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहे. या योजनेत रुग्णांवरील उपचारासाठी दीड लाख रुपये आर्थिक मदत दिली जात होती. पण म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांचा आणि त्यांना लागणाऱ्या औषधांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचंही टोपे यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान, राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार सुरु नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचा पुनरुच्चार टोपे यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, आशिष शेलारांचा आरोपhttps://t.co/HOhzwyyqLT#ashishshelar | #bjp | #bmc | #bmcelection | #mumbai | #shivsena | @ShelarAshish
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या :
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?
औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!
Shortage of amphotericin b injection on mucormycosis in Maharashtra