Covid Vaccination: लस संपण्याच्या भीतीने मुंबईकरांची घाईगडबड; कोव्हिड सेंटरवर नागरिकांची तोबा गर्दी

लसीचा साठा संपल्यास आपल्याला लस मिळणार नाही, या भीतीने नागरिकांनी या केंद्रावर धाव घेतल्याचे सांगितले जाते. | Covid vaccine Mumbai

Covid Vaccination: लस संपण्याच्या भीतीने मुंबईकरांची घाईगडबड; कोव्हिड सेंटरवर नागरिकांची तोबा गर्दी
मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद पडायला सुरुवात झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 1:27 PM

मुंबई: महाराष्ट्राला तातडीने कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने केराची टोपली दाखवल्यानंतर आता मुंबईकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोरोना लसींचा (Covid vaccine) साठा संपत आल्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरली आहे. (Covid Vaccination drive halt in Mumbai due to shortage of vaccine doses)

याच भीतीपोटी शुक्रवारी मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरवर नागरिकांनी लस घेण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याठिकाणी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लसीचा साठा संपल्यास आपल्याला लस मिळणार नाही, या भीतीने नागरिकांनी या केंद्रावर धाव घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, याठिकाणी असणारे कोरोना लसीचे डोस संपत असल्याने मोजक्याच नागरिकांना आतमध्ये घेण्यात आले आहे. परिणामी इतर नागरिकांची गैरसोय झाली आहे.

मुलूंडच्या कोव्हिड सेंटरवर सध्या सोमवारपर्यंत कोणतेही लसीकरण होणार नाही, अशी उद्घोषणा केली जात आहे. त्यामुळे हताश होऊन घरी पतरण्याशिवाय नागरिकांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.

बीकेसीसह मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद

मुंबईसह राज्यात कोरोनाच संसर्ग वाढलेला असतानाच कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आलं आहे.

राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याने खासगी लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. मुंबईत एकूण 120 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैीक 49 लसीकरण केंद्रे शासकीय आहेत. या केंद्रावर रोज 40 हजार ते 50 हजार लस दिल्या जातात. बुधवारी राज्यात 14 लाख डोस होत्या. अनेक जिल्ह्यात आज किंवा उद्या कोरोना लसीचा साठा संपेल. केंद्राला याबाबतची माहिती लिखित स्वरुपात दिली असल्याचं आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं. संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य, वडेट्टीवारांचे संकेत

मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

(Covid Vaccination drive halt in Mumbai due to shortage of vaccine doses)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.