मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा; आहे का कोणाची हिम्मत; अजितदादांनी भाजपवाल्यांना फटकारले
राष्ट्रवादी काँग्रेसचे काल दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन पार पडले, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाच्या अगोदर अजित पवार यांचे भाषण होणार होते. मात्र त्याआधीच व्यासपीठावरुन अजित पवार वॉशरुमला गेले आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले.
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे काल दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन पार पडले, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाच्या अगोदर अजित पवार यांचे भाषण होणार होते. मात्र त्याआधीच व्यासपीठावरुन अजित पवार वॉशरुमला गेले आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. त्यानंतर माध्यमांनी अजित पवार यांना यासंदर्भात विचारल्यानंतर आम्ही वॉशरुमलाही जायचं नाही का असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून येतात, कोणाच्यात हिम्मत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा अशा शब्दात भाजपवाल्यांना त्यांनी फटकारले आहे. त्यामुळे काल दिवसभर अजित पवार यांच्या याच वाक्याची चर्चा होती.