नॉटरिचेबल राहूनही शुभांगी पाटील यांनी केली जंगी मिरवणुकीची तयारी; तांबे मात्र भाजपच्या आशेवर कायम…

शुभांगी पाटलांना मातोश्रीवर बोलावून ठाकरे गटानं त्यांना पाठिंबा दिला आहे. फडणवीस यांच्या खेळीला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कृत्तीतून त्यांनी उत्तर दिलं आहे.

नॉटरिचेबल राहूनही शुभांगी पाटील यांनी केली जंगी मिरवणुकीची तयारी; तांबे मात्र भाजपच्या आशेवर कायम...
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 11:13 PM

नाशिकः नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. ठाकरे गटानं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील अर्ज मागे घेणार की काय ?, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र त्या नॉटरिचेबल राहून शुभांगी पाटलांना अर्ज मागे घेतलाच नाही. तर सत्यजित तांबे यांच्या भाजपच्या पाठिंब्यावरुन सस्पेंस कायम आहे.

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही शेवटच्या मिनिटांपर्यंत राजकीय ड्रामा रंगला होता. ठाकरे गटानं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटलांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती, पण शुभांगी पाटलांनी काही अर्ज मागे घेतला नाही.

तर 3 अपक उमेदवारांनी मात्र अर्ज मागे घेतले आहेत. धनराज विसपुते , धनंजय जाधव आणि अॅड. सुधीर सुरेश तांबे या अपक्ष उमेदवारानीही अर्ज मागे घेतले आहेत. तर नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत प्रमुख लढत निश्चित झाली आहे. त्यामुळे नाशिकात तिहेरी लढत होणार आहे.

सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. सत्यजित तांबे अपक्ष असून त्यांना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. तर अपक्ष सुभाष जंगलेही मैदानात असल्याने त्यांच्यामुळे चुरस वाढली आहे.

नाशिकमध्ये तिहेरी लढत निश्चित झाली असली तरी शेवटच्या मिनिटांपर्यंत ड्रामा पाहायला मिळाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जे काही घडलं आहे, तशाच प्रकारच्या घडामोडी अर्ज मागे घेणार त्या दिवशीही घडल्या आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत कोण अर्ज मागे घेणार यावरुनच आता सस्पेंस वाढला होता.

सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत होणार हे निश्चितच झाले होतं, त्यामुळं शुभांगी पाटलांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपनं प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

पण शुभांगी पाटील सकाळपासून नॉटरिचेबल होत्या.शुभांगी पाटील नॉटरिचेबल झाल्यानं आणखी धाकधूक वाढली होती. त्या अर्ज मागे घेतात की काय ?, अशीही चर्चा सुरु झाली मात्र शुभांगी पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही, आणि दुपारी 3 वाजताच्या नंतरच त्या माध्यमांसमोर आल्या.

नॉटरिचेबलवरुन शुभांगी पाटलांनी सूचक विधानही केलं आहे की, मला धमकी आली होती की नाही, हे कळलच असेल अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटलांनी दिली आहे.

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी होती, त्या दिवशी तर मोठा उलटफेर झाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्जच दाखल केला नाही.

तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अर्जही दाखल केला. इकडे भाजपच्या शुभांगी पाटील भाजपकडून उमेदवारीसाठी उच्छुक होत्या. पण त्यांना भाजपनं शेवटच्या मिनिटांपर्यंत एबी फॉर्म दिलाच नाही.

त्यामुळं त्यांनी अपक्ष अर्ज भरला. वडिलांना थांबवत, सत्यजित ताबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि भाजपकडे जाहीरपणे पाठिंबाही मागितला, याकडे फडणवीसांची खेळी म्हणून पाहिलं जातं आहे.

तर शुभांगी पाटलांना मातोश्रीवर बोलावून ठाकरे गटानं त्यांना पाठिंबा दिला आहे. फडणवीस यांच्या खेळीला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कृत्तीतून त्यांनी उत्तर दिलं आहे.

त्यामुळे आता आता सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा सामना रंगणार आहे. आपल्याला ठाकरे गटाला पाठिंबा असून, महाविकास आघाडीचाही पाठींबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी आणखी ट्विस्ट आला आहे. भाजपला पाठींबा मागितला नाही आणि मागणारही नाही, असं सुधीर तांबे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे 12 तारखेला अर्ज दाखल करताच, सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिब्ंयाची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.