Local Breaking : हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत! वाशी स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, प्रवाशांचा खोळंबा

वाशी स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती आहे. तर पनवेल अप डाऊन लोकल सेवा ठप्प झाली आहे.

Local Breaking : हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत! वाशी स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, प्रवाशांचा खोळंबा
पश्चिम रेल्वेच्या लोकलचं स्पीड वाढणारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 7:04 AM

नवी मुंबई :   हार्बर लाईनवरील लोकल (Harbour Line Local Service) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा (Mumbai Local Passengers) झाला आहे. अनेक प्रवाशांना नेमका खोळंबा का झाला, हे काही कळायला ही मार्ग नव्हता. वाशीत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे पनवेल-सीएसएमटी (Panvel- CSMT Local News) दरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक कोलमडली आहे. पहाटेच झालेल्या या बिघाडामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्यांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे आता सीएसएमटी ते मानखुर्द आणि पनवेल ते वाशी अशी लोकलसेवा मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आल्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या केंद्रीय सूचना प्रसारणाकडून स्थानकात देण्यात आल्यात. तर ट्रान्स हार्बरवरील सेवादेखील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ठप्प झाली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्यांचा खोळंबा झालाय.

दरम्यायान, संदर्भातलं ट्विट सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केलंय. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करुन विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचंही रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.

मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांचं ट्विट

कोणत्या लोकल सेवा सुरु?

मानखुर्द पनवेल ठप्प!

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मानखुर्द ते पनवेल दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. याचा फटका हार्बर मार्गावरील रेल्वेच्या वेळा पत्रकाला बसला. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. तर ट्रान्स हार्बर मार्गावरीलही वेळापत्रक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कोलमडलं. ठाणे ते वाशी दरम्यानची लोकल सेवाही ठप्प झाली होती.

ही लोकल सेवा सुरु!

दरम्यान ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते नेरळ आणि ठाणे ते पनवेल ही लोकलसेवा सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, आता या लोकल सेवेवर ताण येण्याची शक्यता आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांना आता वळसा घालून ठाणामार्गे प्रवास करावा लागणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.