मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाचे निर्बंध (No restrictions) हटवण्यात आले. त्यानंतर शाळाही सुरु करण्यात आल्या. कॉलेजही (Collages in Maharashtra) सुरु झाली. दरम्यान, आता परीक्षाही जवळ आल्यात. अशातच विद्यार्थी मात्र ऑफलाईन परीक्षांना (Offline Exam vs Online Exam) विरोध करत आहेत. ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन पद्धतीनंच परीक्षा घेतल्या जाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीखातर आता विद्यार्थीनींनी कॉलेजच्या गेटसमोरच घोषणाबाजी करत निदर्शनं केली आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांना पुन्हा एकदा सगळं सुरु होतंय. कोरोना महामारीच्या काळात ऑफलाईन परीक्षा शक्य नसल्यानं विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा सगळं सुरु झाल्यानं परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येत आहेत. मात्र ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांकडून विरोध केला जातो आहे. आंदोलन करुन परीक्षा ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली आहे.
गुरुवारी एसएनडीटी कॉलेजच्या विद्यार्थीनींनी आक्रमक पवित्रा घेतला. पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थीनींनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एसएनडीटी हाय हाय’ असे नारे यावेळी लगावण्यात आले.
चर्चगेट येथील एसएनडीटी कॉलेजच्या गेटसमोरील रस्त्यावर बसून विद्यार्थींनींनी ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर पोस्टर झळकावत निदर्शनंही केली. दरम्यान, रस्त्यावरच आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थीनीमुळे वाहतूक कोंडी होण्याची भीती होती. मात्र पोलिसांनी तत्काळ विद्यार्थीनींच्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
यावेळी कॉलेजच्या मुलींनी मुख्याध्यापकांना गेटवर येण्याचं आवाहन केलं. परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या विरोधात असलेल्या मुलींनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कॉलेज प्रशासनानं नेमकं विद्यार्थीनींच्या मागणीबाबात काय निर्णय घेतला आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
दुसरीकडे मुंबई विद्यापीठानं ऑफलाईन परीक्षांचा निर्णय घेतलाय. मात्र ऑफलाईन परीक्षा घेताना एक दिलासाही विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देताना प्रतितास पंधरा मिनिटांचा अतिरीक्त वेळ देण्यात येणार आहे. हा निर्णय फक्त यावेळच्या परीक्षांसाठी लागू असणार आहे. दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडलेली असल्याकारणानं हा दिलासादायक निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. त्याआधी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याांनीही ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईनच परीक्षा व्हाव्यात, अशी मागणी केली होती.
अरे आवरा रे या शाळांना कुणीतरी ! सरकारचं फक्त कागदोपत्री नियंत्रण, फी काय कमी व्हायचं नाव घेईना
Intelligence Bureau : मान सम्मान आणि प्रतिष्ठेची नोकरी करणार काय ? खाली सविस्तर बातमी दिलीये वाचा…