सामजिक बांधिलकी! म्हाडा उभारणार गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रुग्णालय आणि प्राण्यांसाठी निवारा

म्हाडा आता सामाजिक बांधिलकीतून गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधणार आहे. तसेच रुग्णांसाठी रुग्णालय आणि पाळीव प्राण्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सामजिक बांधिलकी! म्हाडा उभारणार गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रुग्णालय आणि प्राण्यांसाठी निवारा
आता म्हाडाचं घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, अत्यल्प उत्पन्न मर्यादेत दुप्पट वाढ, इतरही उत्पन्न मर्यादेत वाढ
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 12:04 PM

मुंबई : अल्प व मध्यम उत्पन्न गट तसेच उच्च उत्नन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात म्हाडाच्या वतीने घरे (House)उपलब्ध करून दिले जातात. मात्र आता म्हाडा सामाजिक बांधिलकी जपताना देखील दिसून येत आहे. सामाजिक बांधिलकीतून (Social Commitment) गरजू रुग्णांसाठी रुग्णालय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच पाळीव प्राण्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था आता म्हाडाच्या (MHADA) वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाने योजना तयार केली आहे. यासोबतच नव्या गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करताना घरांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सोबतच गृहप्रकल्पांमध्ये ऊर्ज बचतीची साधने देखील बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हाडाने इमरतींची उभारणी करताना पर्यावरणपूरक घरे बांधण्यााच निर्णय घेतला आहे. नवे प्रकल्प उभारताना कमीत कमी पर्यावरणाची हानी होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

कॅन्सरग्रस्तांच्या कुटुंबांची सोय

म्हाडाच्या वतीने टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबांच्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी देखील पुढाकार घेण्यात आला आला आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्ण येतात. या रुग्णांवर अनेक दिवस उपचार सुरू असतो. अशा स्थितीत गरीब कुटुंबांची तिथे राहण्याची व्यवस्था होत नाही. जागेचा प्रश्न असतो. हीच समस्या लक्षात घेऊन म्हाडाच्या वतीने अशा कुटुंबीयांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्यानंतर म्हाडा गरजू रुग्णांसाठी रुग्णालय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच पाळीव प्राण्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करणार आहे.

पर्यावरणपूरक घरांची निर्मिती

म्हाडाने नव्या प्रकल्पांची उभारणी करताना पर्यावरणपूरक घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे प्रकल्प उभारताना घरांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सोबतच गृहप्रकल्पांमध्ये ऊर्ज बचतीची साधने देखील बसवण्यात येणार आहेत. नवे प्रकल्प उभारताना पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे देखील म्हाडाच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.