कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह, मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत विविध अॅक्शन प्लॅन केले जात (Special Mortuary house Corona Virus death) आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह, मुंबई महापालिकेचा निर्णय
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 9:03 AM

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Special Mortuary house Corona Virus death)  आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत विविध अॅक्शन प्लॅन केले जात आहेत. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी आता स्वतंत्र शवागृह तयार केले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण (Special Mortuary house Corona Virus death)  वाढत आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळा नातेवाईक लवकर येत नाहीत. कित्येकदा नातेवाईक न आल्याने हे मृतदेह शवागृहात पडून राहतात. त्यांची लवकर विल्हेवाट लावणे गरजेचे असते. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी शवागृहाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे निर्देश गटनेता बैठकीत देण्यात आले आहेत.

त्याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. अनेकदा रुग्णालयातील बेड फूल्ल झाले आहेत, असे सांगत खासगी रुग्णालय रुग्णांवर उपचार करताना टाळाटाळ करतात. पालिकेच्या नियमानुसार, खासगी रुग्णालयात गरीबांसाठी 20 टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे.

मात्र आधीच खाटा रुग्णांमुळे फूल्ल असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे खासगी रुग्णालयात यापुढे पालिकेतील एका अधिकाऱ्याची नोडेल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर काही खासगी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. ती सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर अद्याप ही रुग्णालय बंद आहेत. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

रुग्णालयांबाहेर पुरेशा रुग्णवाहिका असाव्यात. तसेच क्वारंटाईन आणि प्रतिबंधित क्षेत्राची माहिती वेळोवेळी गटनेत्यांना द्यावी, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात (Special Mortuary house Corona Virus death)  आली.

संबंधित बातम्या : 

Shocking Video : मृतदेहाशेजारी कोरोना रुग्णांवर उपचार, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र

वरळी कोळीवाडा सीलमुक्त होण्याच्या मार्गावर, कोळीवाड्याने करुन दाखवलं!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.