ऐरोली ते कटाई नाका फ्रीवेसाठी विशेष ट्रॅफीक ब्लॉक, वाहतूकीत बदल
ऐरोली ते कटाई नाका फ्रीवेच्या कामासाठी गेल्या रविवारी मुंब्रा- शिळफाटा दरम्यान 18 डिसेंबरला पहिला ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. त्यात एकूण चार गर्डर उभारण्यात आले. आता दुसरा ट्रॅफीक ब्लॉक येत्या रविवारी, दि.25 डिसेंबरला घेतला जाणार आहे. याब्लॉकमध्ये आता उर्वरित चार गर्डर उभारले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण आठ गर्डर उभारले जाणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पाचे काम विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेले असून या प्रकल्पाची लांबी 12.3 कि.मी. इतकी आहे. तसेच हा प्रकल्प -3 भागांत प्रगतीपथावर आहे. हा पूर्णतः उन्नत असून भारत बिजलीजवळ या भागात उड्डाणपूलाची उंची साधारणतः जमिनीपासून 15 मीटर इतकी असेल. तसेच या 8 गर्डरचे एकूण वजन अंदाजीत 650 मेट्रिक टन इतके आहे.
ऐरोली ते कटाई नाका फ्रीवेच्या कामासाठी गेल्या रविवारी मुंब्रा- शिळफाटा दरम्यान 18 डिसेंबरला पहिला ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. त्यात एकूण चार गर्डर उभारण्यात आले. आता दुसरा ट्रॅफीक ब्लॉक येत्या रविवारी, दि. 25 डिसेंबरला घेतला जाणार आहे. याब्लॉकमध्ये आता उर्वरित चार गर्डर उभारले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण आठ गर्डर उभारले जाणार आहेत.
या महत्वपूर्ण अभियांत्रिकी कामामध्ये क्रेनच्या सहाय्याने दोन गर्डर एकाचवेळी उचलले जातील. या दोन गर्डरचे एकत्रित वजन सुमारे 160 ते 190 मेट्रिक टन इतके असेल. या गर्डर उभारणीसाठी A – 750 टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेन, तसेच डायाफ्राम जोडणीसाठी 2 अतिरिक्त क्रेन वापरल्या जातील अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
ऐरोली – कटाई नाका रस्ता प्रकल्पातील हा अवघड पण महत्त्वाचा टप्पा आहे. या गर्डरची उभारणी पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण होईल. तसेच पारसिक बोगद्याचे काम सुध्दा प्रगतीपथावर असून त्याचे काम 66 % टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.