मुंबई : दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भरधाव कारने आठ जणांना उडवले. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी आहेत. ‘जनता कॅफे’समोर उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना कारने धडक दिली. (Speeding car hits eight killing five in accident near Mumbai Crawford Market)
क्रॉफर्ड मार्केटजवळ काल (सोमवार 31 ऑगस्ट) रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव एस्टीम कारने क्रॉफर्ड मार्केटसमोरुन येऊन पुलाखालून मेन रोड क्रॉस केला. गाडीने हॉटेल ‘जनता कॅफे’ला जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्यावर आणि हॉटेलच्या समोर उभे असलेले अनेक जण जखमी झाले.
जखमी झालेल्या 8 जणांना जवळच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर चार गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हॉटेलला धडक दिल्यानंतर कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघातात कारचालकही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलिस तपास करत असून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकाराची शक्यताही नाकारता येत नाही.
Mumbai: Five persons have been injured after a speeding car ran over them in Crawford Market, earlier today. The injured have been shifted to JJ Hospital. Police team present at the spot. #Maharashtra pic.twitter.com/EGBKD51Hyh
— ANI (@ANI) August 31, 2020