मुंबई : स्पाईस जेट (Spice Jet) कंपनीचं विमान वादळात सापडल्यानं विमानात मोठे हादरे जाणावले. पश्चिम बंगलाच्या दुर्गापरू जिल्ह्यातील काढी नझरुल इस्लाम विमानतळावर या विमानाचं लॅन्डिंग होणार होतं. या लॅन्टिंगच्या वेळी विमानात मोठे झटका जाणवला. विमानात जाणवलेले झटके इतके भीषण होते, की विमानाच्या आतमध्ये ठेवलेलं सामान प्रवाशांच्या डोक्यावर आदळलं आणि काही प्रवासी जखमीही झाले. जवळपास 40 प्रवाशांना टर्ब्युलन्समुळे (Extreme turbulence in a flight) सामान अंगावर पडून जखमा झाल्यात. सगळेच प्रवासी या वातावरणात गोंधळू गेले होते. यावेळी ऑक्सिजन मास्कही (Oxygen Mask n Flight) खाली आले होते. या बाबतचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ देखील समोर आलाय. B737 मॅक्स या स्पाईस जेटच्या विमानात हा प्रकार घडला. सुदैवानं मोठा अनर्थ यावेळी टळला. प्रवाशातील सर्व प्रवासी सुखरुप असून 10 प्रवाशांना गंभीर जखम झाली आहे. वाईट हवामानाचा फटका या विमानाला बसला.
विमानात लॅन्डिंगच्या अगोदर टर्ब्युलन्स जाणवू लागल्यामुळे आधी विमानातील सगळेच प्रवासी घाबरुन गेले होते. नेमकं काय होतंय? काय झालंय? यावरुन प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. विमानात प्रवाशांना वातावरणातील वादळामुळे झटके जाणवत होते. त्यामुळे प्रवाशांचाही थरकाप उडाला होता.
या संपूर्ण घटनेच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विमानातील अटेंडंट आणि एअर हॉस्टेस प्रवाशांची काळजी घेत, त्यांना धीर देण्यासाठी धावपळ करत असल्याचंही दिसून आलंय. अत्यंत वाईट हवामानामुळे विमानात भयंकर टर्ब्युलन्स जाणवू लागल्यानं प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. या घटनेच्या व्हिडीओमध्ये ऐकू येत असलेला प्रवाशांचा आवाज आणि आरडाओरडा अंगावर काटा आणणार होता.
Extreme turbulence in a flight between Mumbai to Durgapur. I can feel what’s going on in the minds of passengers when oxygen masks are coming down.
Airline was SpiceJet. Again it was B737 MAX.
Never travelling in this aircraft.
But thankfully no major accident. ?#SpiceJet pic.twitter.com/j7225Ag0UZ— Yuvraj Sharma (@SharmaYuv1) May 1, 2022
दरम्यान, सुदैवानं अपघात होता होता वाचलाय, अशी भावना काहींनी व्यक्त केली आहे. तर या टर्ब्युलन्समुळे गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं जवळच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र स्पाईस जेटच्या या विमानात घडलेला प्रसंग प्रवाशांच्या अंगावर काटा आणणार होता.