मोठी बातमी: मुंबई विमानतळालगतच्या 80 हजार झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
Mumbai Airport | झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत (SRA) या परिसराचा विकास करताना 2000 सालापर्यंतच्या झोपड्या वैध धरण्यात येणार आहेत. या झोपडीधारकांचे एमएमआर प्रदेशात कुठेही पुनवर्सन करण्याची मुभा आहे.
मुंबई: मुंबई विमानतळालगत असणाऱ्या 65 एक जागेवरील 80 हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला (MIAL) झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत (SRA) या परिसराचा विकास करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यापूर्वी HDIL कंपनीला अशाप्रकारची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ती रद्द करण्यात आली होती. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने शुक्रवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. या नव्या आदेशामुळे या भागातील 80 हजार झोपड्यांच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. (SRA development of slum area near Mumbai airport)
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत (SRA) या परिसराचा विकास करताना 2000 सालापर्यंतच्या झोपड्या वैध धरण्यात येणार आहेत. या झोपडीधारकांचे एमएमआर प्रदेशात कुठेही पुनवर्सन करण्याची मुभा आहे.
राज्य सरकारने SRA ची घरे विकण्याची कालमर्यादा घटवली
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने SRA ची घरे विकण्याची मर्यादा घटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार SRA अंतर्गत मिळालेली घरे 5 वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती. या निर्णयामुळे SRA ची घरे असलेल्यांना मोठा लाभ झाला होता. ज्या नागिरकांना SRA अंतर्गत घरे मिळालेली आहेत त्यांना आपली घरं 10 वर्षांपर्यंत विकता येत नव्हती. तसा प्रयत्न केलाच तर घऱमालकावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, यानंतर आता ही कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
इतर बातम्या :
जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय, SRA ची घरे विकण्याची मर्यादा घटवली
मुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या
म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार
(SRA development of slum area near Mumbai airport)