बिल्डरांनी रखडवलेले प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार, जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. (SRA will take over incomplete project from builders, says housing minister jitendra awhad)

बिल्डरांनी रखडवलेले प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार, जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 4:52 PM

मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (SRA will take over incomplete project from builders, says housing minister jitendra awhad)

एसआरएमध्ये LOI (आशयपत्र) घेतले म्हणजे तुम्ही जमिनीचे मालक होत नाही. अनेक बँकांनी, संस्थांनी LOI बघून बिल्डरांना कर्ज दिलेले आहे. खरं तर या बँकांनी पुन्हा एसआरएकडे यायला हवं होतं. बिल्डरांनी पैसे घेतले एसआरएसाठी आणि ते भलतीकडेच लावले. त्यामुळे असे जे प्रकल्प रखडले आहेत ते एसआरए ताब्यात घेईल. एसआरएच हे प्रकल्प पूर्ण करून लोकांना घरेही देईल, असं आव्हाड म्हणाले.

अधिकाऱ्यांवर कारवाई करू

हजारो लोक आज रस्त्यावर आहेत. त्यांना भाडेही मिळत नाही. त्यामुळे हे प्रकल्प म्हाडा ताब्यात घेईल. यापुढे LOI घेतल्यानंतर किती दिवसात काम करायचे याची कायद्यात तरतूद केली जाईल. जवळजवळ 50 हजार कोटी रुपये बिल्डरांनी गुंतवले आहेत. तरीही हे प्रकल्प तयार झालेले नाहीत. बिल्डरांनी LIO दाखवून कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतली आहेत, असं सांगतानाच ज्या एसआरए प्रकल्पात मूळ रहिवाशांची घरे न बांधता विक्री करण्यासाठी आधी इमारती बांधल्या असतील अशा ठिकाणी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

म्हाडाबाबत उद्या बैठक

म्हाडा महारेराच्या यादीत येणं गंभीर आहे. याबाबत मी अधिकार्‍यांशी बोललो आहे. उद्या याबाबत मी बैठक लावली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काय बोलावं?

यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकलबाबतच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी कोणतीच जबाबदारी घेऊ नये, लसीकरणाची जबाबदारीही त्यांची नाही. यावर काय बोलावं?, असा सवाल त्यांनी केला आहे. (SRA will take over incomplete project from builders, says housing minister jitendra awhad)

संबंधित बातम्या:

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत खासदार संभाजीराजेंसमोर समन्वयकाचा गोंधळ, बोलू दिलं जात नसल्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच मास्कशिवाय जाहीर कार्यक्रमात भाषण; वाचा काय म्हणाले?

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा

(SRA will take over incomplete project from builders, says housing minister jitendra awhad)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.