दहावीचा आणखी एक पेपर फुटला
भिवंडी : दहावीचा पेपर पुन्हा एकदा फुटला आहे. दहावीचा समाजशास्त्राचा पेपर परीक्षेपूर्वी अर्धातास आधीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर कशी व्हायरल झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे 15 मार्चला विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिकाही परिक्षा सुरु होण्यापूर्वीच व्हायरल झाली होती. याबाबत एसएससी परीक्षा मंडळाकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केले गेल्याने, शहर पोलीस ठाण्यात […]
भिवंडी : दहावीचा पेपर पुन्हा एकदा फुटला आहे. दहावीचा समाजशास्त्राचा पेपर परीक्षेपूर्वी अर्धातास आधीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर कशी व्हायरल झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे 15 मार्चला विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिकाही परिक्षा सुरु होण्यापूर्वीच व्हायरल झाली होती. याबाबत एसएससी परीक्षा मंडळाकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केले गेल्याने, शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतरसुध्दा परीक्षा मंडळाकडून गांभीर्य न बाळगल्याने, पुन्हा पेपरफुटीचा प्रकार समोर आला आहे.
दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 पर्यंत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर दहावी परीक्षा घेतली जात आहे.
दहावीचं वेळापत्रक आधी व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत होतं, आता प्रश्नपत्रिकाही परीक्षेपूर्वीच व्हायरल होत असल्याने चिंतेची बाब आहे.