SSC Result mahresult.nic.in : दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी घटला
SSC Result mahresult.nic.in : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जाहीर झाला आहे.
SSC Result mahresult.nic.in पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जाहीर झाला आहे. यंदा निकालात तब्बल 12.31 टक्क्यांनी घट झाली आहे. राज्याचा निकाल 77.10 टक्के इतका असून, यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल 82.82 टक्के इतका आहे. तर मुलांची टक्केवारी 72.18 इतकी आहे. शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्यात 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी जवळपास 12 लाख विद्यार्थी पास झाले. महत्त्वाचं म्हणजे राज्यात नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 67.27 टक्के इतका लागला आहे. नऊ मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
विभागवार निकाल
- कोकण ८८.३८
- कोल्हापूर ८६.५८
- पुणे ८२.४८
- नाशिक ७७.५८
- मुंबई ७७.४0
- औरंगाबाद ७५.२०
- अमरावती ७१.९८
- लातूर ७२.८७
- नागपूर ६७.२७
निकालाची वैशिष्ट्ये
- नऊ विभागीय मंडळात एकूण 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थी नोंदणी
- यापैकी 16 लाख 18 हजार 602 परीक्षेला बसले तर 12 लाख 48 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण
- निकालाची टक्केवारी- 77.10
- विद्यार्थ्यांचा निकाल- 72.18 टक्के
- विद्यार्थिनींचा निकाल – 82.82 टक्के
- यंदा मुलींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 10.64 टक्क्यांनी जास्त
- नऊ विभागीय मंडळातून सर्व शाखांत एकूण 59 हजार 603 पुनपरीक्षार्थी नोंदणी त्यापैकी 58 हजार 665 परीक्षा दिली त्यापैकी 18 हजार 957 विद्यार्थी पास, एकूण टक्केवारी 32.32 टक्के निकाल
दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबाबत उत्सुकता लागली होती. दरम्यान काल 7 जूनला बोर्डाने अधिकृतरित्या 8 जूनला म्हणजेच आज निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं.
निकाल कुठे पाहाल ?
दहावीचा निकाल कसा पाहाल?
दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर जाल, तेव्हा तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा.
उदाहरणार्थ :समजा तुमचा परीक्षा क्रमांक M123456 असेल आणि आईचे नाव प्रियांका असेल, तर तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर पहिल्या कॉलममध्ये M123456 आणि दुसऱ्या कॉलममध्ये म्हणझे आईच्या नावाच्या कॉलममध्ये PRI असे टाईप करा. त्यानंतर एन्टर केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल.
दहावीच्या परीक्षेला राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. राज्यातील जवळपास 3 हजार परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवार 10 जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.