मुंबई : चेंबूर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्याने आधी पेपर दिला आणि त्यानंतर आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार (SSC Student father death before exam) केले. दहावीच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे सोमवारी (2 मार्च) रात्री अचानक निधन झाले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहावीचा पेपर होता. जर पेपर दिला नसता तर वर्ष वाया गेले असेत. त्यामुळे या विद्यार्थ्याने पहिला पेपर दिला त्यानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार केले. सर्वच स्तरातून विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे. संदेश साळवे असं या विद्यार्थ्याचे नाव (SSC Student father death before exam) आहे.
संदेश हा चेंबूरच्या टिळक नगरमधील पंचशील नगरमध्ये राहतो. येथे त्याची आई, बहिण, आजी-आजोबा आणि मृत वडील राहत होते. संदेशचे वडील परमेश्वर साळवे हे हाऊस किपिंगचे काम करत होते. तर त्याची आई घरकाम करते. परमेश्वर यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण अखेर समोवारी रात्री त्यांचे निधन झाले. दुसऱ्या दिवसापासून दहावीचे पेपर सुरु होत असल्यामुळे संदेशने पहिला पेपर दिला आणि त्यानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, संदेशने शिक्षणाला प्राधान्य देत परीक्षा दिली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. आपल्या दुःखाच्या घटनेत सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देण्यात संदेश यशस्वी झाला. या घटनेतून त्याने एक वेगळा आदर्श समाजासमोर मांडला.