मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बस उलटून अपघात
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात झाला. या अपघातात बस उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात झाला. या अपघातात बस उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अपघात झाला तेव्हा या बसमध्ये तीन जण प्रवास करत होते. यापैकी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी कंडक्टरला ताब्यात घेतलंय. बसचा चालक मात्र फरार आहे. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही (ST Bus accident on Western Express Highway over Goregaon Bridge).
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बसचा उलटल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र, नंतर उलटी झालेली बस रस्त्यातून हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं. विशेष म्हणजे चालक फरार झाल्याने या अपघाताविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. चालक पळण्याचं कारण काय? असाही सवाल केला जात आहे. अपघात झालेली बस दहिसर भागातून मुंबईच्या दिशेने जात होती.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बसचा अपघात, गोरेगाव पुलावर बसला उलटल्याने वाहतूक ठप्प, बसमध्ये 3 प्रवासी, एक जण जखमी, कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात, ड्रायव्हर फरार#Mumbai #Accident pic.twitter.com/R69IM0PiZH
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
पोलीस घटनास्थळी पोहचले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :
‘बाईकला हेल्मेट दाखवल्याशिवाय सुरूच होणार नाही’, लातूरमधील पट्ठ्याची जुगाडातून कमाल
Mumbai-Pune Express way : रस्ते दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या इंजिनिअरचा रोलरखाली चिरडून मृत्यू!
चिमुरड्याचा क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
व्हिडीओ पाहा :
ST Bus accident on Western Express Highway over Goregaon Bridge