मुंबई पालिकेतर्फे रुग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण, ‘या’ रुग्णालयाचा अव्वल क्रमांक
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रुग्णालयांचे नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण करण्यात (st. george hospital mumbai win in cleaning survey) आले.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रुग्णालयांचे नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण करण्यात (st. george hospital mumbai win in cleaning survey) आले. यावेळी रूग्णालय, रूग्णालय परिसरातील स्वच्छता, बाह्य रूग्ण विभाग, रूग्णांचे वार्ड, ऑपरेशन थिएटर यांसह इतर निकषही तपासण्यात आले. या सर्वच निकषामध्ये मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयाने अव्वल क्रमांक पटकावला (st. george hospital mumbai win in cleaning survey) आहे.
नुकंतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते सेंट जॉर्जेस रुग्णालयाला मानपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.
2019-2020 साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रूग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात रूग्णालय, रूग्णालय परिसरातील स्वच्छता, बाह्य रूग्ण विभाग, रूग्णांचे वार्ड, ऑपरेशन थिएटर, रूग्णालयातील स्वंयपाकगृह, इत्यादींची स्वच्छता, रूग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुका कचरा, ओला कचरा, वैद्यकीय कचरा यांची विल्हेवाट, रुग्णालय, रूग्णालय परिसर व रूग्णांशी संबंधित साधन सामग्रीचे निर्जंतूकीकरण या बाबतच्या संपूर्ण प्रक्रिया इत्यादी निकषांचा या स्वच्छता सर्वेक्षणांमध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. यात मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
या पुढे देखील सेंट जॉर्जेस रुग्णालय स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहील, असा विश्वास या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी व्यक्त (st. george hospital mumbai win in cleaning survey) केला.