Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thackeray : मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (23 जानेवारी) कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय […]

Balasaheb Thackeray : मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 6:49 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (23 जानेवारी) कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते (Statue of Shivsena Chief Balasaheb Thackeray in Mumbai).

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे यांचा हा ब्राँझ पुतळा श्यामाप्रसाद चौकात बसवण्यात आलाय.

आदित्य ठाकरे म्हणाले, “हा क्षण भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईसह महाराष्ट्रावर प्रभाव होता. त्यामुळेच आज त्यांच्या या कार्यक्रमासाठी इतक्या लोकांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात सर्वांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले.”

एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच होते त्यामुळे सर्वजण उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरेंचं राज्यासाठी आणि देशासाठीचं योगदान कुणीही विसरु शकणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झालाय, लवकरच त्यांच्या स्मारकाचंही काम पूर्ण होईल.”

आज अतिशय चैतन्यपूर्ण आणि सजीव पुतळा मुंबईत उभा राहिलाय. हा पुतळा मुंबईवर हल्ला करणाऱ्या प्रवृतीलाही चोख उत्तर देईल, असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.

राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान (Balasaheb Thackeray Statue Unveiling Ceremony) मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला (Balasaheb Thcakeray Birth Anniversary)  करण्यात आलं.

 बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित?

  • उद्धव ठाकरे
  • आदित्य ठाकरे
  • रश्मी ठाकरे
  • राज ठाकरे
  • अमित ठाकरे
  • शरद पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • बाळासाहेब थोरात
  • प्रविण दरेकर
  • अस्लम शेख
  • एकनाथ शिंदे
  • छगन भुजबळ
  • महापौर किशोरी पेडणेकर

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर आले.

हेही वाचा :

Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

 मराठी माणूस ते हिंदुत्व, शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये काय काय बदललं?

राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश

व्हिडीओ पाहा :

Statue of Shivsena Chief Balasaheb Thackeray in Mumbai

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.