अजित पवार-नितेश राणे यांच्यात स्टीकरवॉर; स्टीकर संभाजी महाराज यांचेच पण,…

| Updated on: Jan 07, 2023 | 11:35 PM

नितेश राणेंनी गाड्यांवर धर्मवीर असा स्टीकर लावला. आणि स्वराज्यरक्षक हा शब्द राष्ट्रवादीनं एका मालिकेच्या प्रमोशनसाठी वापरल्याचा आरोप केला.

अजित पवार-नितेश राणे यांच्यात स्टीकरवॉर; स्टीकर संभाजी महाराज यांचेच पण,...
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला. पण अजित पवार यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या काही गाड्यांवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ अशा आशयाचे स्टिकर लावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता नितेश राणेंनी ‘धर्मवीर संभाजी महाराज’ असे स्टिकर लावले आहेत. अजित पवारांनी विधानसभेत बोलताना संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं. त्याच्यावर नितेश राणेंनी टीका केली.

वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही पदवी दिलेली आहे. आता कुणीतही सांगतो की, धर्मवीर पदवी लावू नका. सिरीअल चालावी म्हणून कागदावर काहीतरी लिहून देतो.

पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवितात. यामुळं पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या गोष्टी काही थांबणाऱ्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत. ते धर्मवीरचं राहणार असंही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं.

नितेश राणेंनी गाड्यांवर धर्मवीर असा स्टीकर लावला. आणि स्वराज्यरक्षक हा शब्द राष्ट्रवादीनं एका मालिकेच्या प्रमोशनसाठी वापरल्याचा आरोप केला.

नितेश राणेंनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेवरुन आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राणेंवर घणाघाती टीका केली. संभाजी महाराजांना दिल्या जाणाऱ्या उपाधीवरुन अजित पवार बोलल्यानंतर हा वाद सुरु झाला. तो वाद राणेंनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेकडं वळवण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीनं लावलेल्या स्टीकर्सविरोधात स्वत:ही स्टीकर्स लावत प्रत्युत्तरही दिलंय.