‘राज्यराणी’वर दगडफेक, मोटरमनच्या डोळ्यात काच घुसली!
मुंबई : धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, या घटनेत राज्यराणी एक्स्प्रेसच्या मोटरमनच्य डोळ्यात काच घुसली आहे. वासिंद आटगाव येथे घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडं भिरकावली. काल (4 डिसेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या […]
मुंबई : धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, या घटनेत राज्यराणी एक्स्प्रेसच्या मोटरमनच्य डोळ्यात काच घुसली आहे. वासिंद आटगाव येथे घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडं भिरकावली. काल (4 डिसेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसला. मोटरमनने एक्स्प्रेस वाटेत न थांबवता ती थेट कसारा येथे थांबवून याबाबतची तक्रार दिली.