पवई तलावात औषध फवारणी, महापालिकेला प्रदूषण महामंडळाची नोटीस; भाजप म्हणते, ही तर आदित्य ठाकरेंना चपराक
पवई तलावात महापालिकेच्या एस वॉर्डाने औषध फवारणी केल्याने जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला होता. या फवारणीला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पालिकेला नोटीस बजावली आहे. (Stop spraying herbicide in Powai Lake: Pollution board to BMC)
मुंबई: पवई तलावात महापालिकेच्या एस वॉर्डाने औषध फवारणी केल्याने जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला होता. या फवारणीला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पालिकेला नोटीस बजावली आहे. त्यावरून भाजप आमदार योगेश सागर यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं आहे. ही तर आदित्य ठाकरेंना चपराक असल्याचं योगेश सागर यांनी म्हटलं आहे. (Stop spraying herbicide in Powai Lake: Pollution board to BMC)
पवई तलावात पालिकेच्या एस वॉर्डकडून तणनाशक फवारणी करण्यात येत असल्याचं सर्वात आधी वृत्त दाखवलं होतं. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या फवारणीला विरोध केला होता. या फवारणीमुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याचा दावा करतानाच पालिकेच्या या कृतीचा पर्यावरणवाद्यांनी निषेध नोंदवला होता. त्याची दखल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने घेतल महापालिकेच्या एस वॉर्डला नोटीस बजावली आहे. प्रदूषण महामंडळाने पालिकेला नोटीस बजावून पवई तलावात पालिकेकडून तणनाशकावर करण्यात येणारी फवारणी थाबवावी असे दिले आदेश आहेत. त्यामुळे महापालिकेला ही फवारणी थांबवावी लागणार आहे.
हे तर टक्केवारीचे धंदे
या प्रकरणावर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवई तलावावरील जलपर्णीवर रासायनिक फवारणी करण्यात आली. जलपर्णीला खत्म करण्यासाठी हा खटाटोप? हे कोणतं शिवसेनेचं पर्यावरण प्रेम आहे. हे कोणतं आदित्य ठाकरेंचं पर्यावरण प्रेम आहे? त्यात मगरी आहेत. जीवं आहेत. मासे आहेत. शेकडो जीव आहेत. पवई तलाव मुंबईची शान आहे. त्या जलपर्णीला काढण्याचे अन्य मार्ग आहेत. आपण कुठून तरी एखादी संस्था आणता, त्यांचा अनुभव पाहात नाही. केवळ आणि केवळ टक्केवारीचे हे धंदे आहेत. तेही पर्यावरणावर. हे योग्य नाही, असं सागर म्हणाले.
आयुक्त, महापौरांवर कारवाई करा
महापालिकेच्या आयुक्तावर कारवाई केली पाहिजे. महापौरांवर कारवाई केली पाहिजे. कुठल्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघाले आहेत. तलाव वाचवायचे राहिले बाजूला असलेल्या तलावावर तुम्ही केमिकलची फवारणी करत आहात. तेही बिन अनुभवी संस्थेकडून? कोणते बगलबच्चे सांभाळायचे आहेत तुम्हाला? असं जर पुन्हा मुंबईत करणार असाल तर मुंबईची जनता सहन करणार नाही. हे आदित्य ठाकरेंनी समजून घ्यावं, असा इशारा योगेश सागर यांनी दिला. (Stop spraying herbicide in Powai Lake: Pollution board to BMC)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
नगरच्या कोरोनाचे नाशिकवर विघ्न, चाचण्या वाढवण्याचे आदेश; सिन्नरमध्ये पुन्हा 296 रुग्ण
(Stop spraying herbicide in Powai Lake: Pollution board to BMC)