‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देई ना… पालिकेच्या दुटप्पी धोरणामुळे फेरीवाल्यांचे हाल’

अतिक्रमण विभाग पूर्वीपासूनच अवैधरित्या फुटपाथवर बसणाऱ्या लोकांवर कारवाई करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.| Street hawkers

'आई जेवू घालीना, बाप भीक मागू देई ना... पालिकेच्या दुटप्पी धोरणामुळे फेरीवाल्यांचे हाल'
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:33 PM

ठाणे: सध्या कोरानाच्या पार्श्वभुमीवर अनेक फेरीवाल्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, त्याचवेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे. त्यामुळे पालिकेच्या अशा दुटप्पी धोरणामुळे फेरीवाल्यांना दिलासा कसा मिळणार, असा सवाल माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. (Street hawkers facing problems in Thane )

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेतंर्गत एकूण उद्दीष्ट 22,100 ठेवण्यात आले असून, त्यापैकी 19,769 लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 10 हजार इतके कर्ज मंजूर केल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या सदर विशेष सुक्ष्म पुरवठा योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी सुरु असून आहे. मात्र, कारवाई करून फेरीवाले आत्मनिर्भर होतील का असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला.

फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कर्ज देणे कितपत योग्य व उचित आहे याचाही प्रशासनाने जरुर तो विचार करावा. कारण फेरीवाल्यांवर कारवाई देखील केली जात असून आत्मनिर्भर बनविण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. यामुळे नाहक फेरीवाला भरडला जात आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता फेरीवाल्यांची परिस्थिती “आई जेवू घालीना, बाप भीक मागू देई ना ” अशी झाल्याचे टिप्पणी मिनाक्षी शिंदे यांनी केली.

यावर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पालिकेची बाजू स्पष्ट केली आहे. आम्हाला फेरीवाल्यांना नाहक त्रास द्यायचा नाही. अतिक्रमण विभाग पूर्वीपासूनच अवैधरित्या फुटपाथवर बसणाऱ्या लोकांवर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे पंतप्रधान स्वानिधी योजना? – ‘कोरोना’च्या संकटकाळात फिरते विक्रेते किंवा फेरीवाल्यांना मोठा आर्थिक फटका – सुलभ कर्जासाठी येत्या महिन्याभरात विशेष योजना – 10 हजारांचे खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) मिळणार – आर्थिक देयकाद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाईल – वेळेत परतफेड केल्यास वर्किंग कॅपिटल क्रेडिट वाढवून उपलब्ध करुन दिले जाईल. – सुमारे 50 लाख पथ विक्रेत्यांना लाभ – 5000 कोटींची सुविधा

संबंधित बातम्या:

Nirmala Sitharaman | फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजारापर्यंत कर्ज, सीतारमण यांची मोठी घोषणा

PM SVANidhi Scheme : फेरीवाल्यांसाठी केंद्राची मोठी योजना, 3 लाख पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

फेरीवाल्यांचे धक्के खात आयुक्त कल्याण-डोंबिवलीत, तासाभरात कारवाईचा बडगा

(Street hawkers facing problems in Thane )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.