चॅट, वॉइस नोट, कॉल रेकॉर्डिंग आणि बरंच काही… समीर खानविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे

समीर खानविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

चॅट, वॉइस नोट, कॉल रेकॉर्डिंग आणि बरंच काही... समीर खानविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 9:14 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात बुधवारी रात्री अटक करण्यात आली. दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली. त्यानंतर चौकशीमध्ये समीर खानविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. (Strong evidence against Sameer Khan to NCB)

करन सजनानी ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना समन्स बजावल्यानंतर त्यांना एनसीबीने अटक केली. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. त्यानंतर आता चौकशीत विविध खुलासे होऊ लागलेले आहेत.

समीर खान हा एका प्रकारे करन सजनानीचा पार्टनर होता. ड्रग व्यवसायासाठी ह्या दोघांचा मोठा प्लॅन होता. करन ब्रिटीश नागरिक आहे म्हणून त्याच्यावर काही निर्बंध होते आणि तो पैशांचं ट्रान्जॅक्शन राहिला फर्नीचरवाला हिच्या एकाउंट मार्फत करत असून समीर हा सजनानीच्या एकाउंट मध्ये ट्रांजेक्शन करत होता. समीर खानची क्रिकेट लीग आहे, फुटबॉल लीग आहे, सलून दुकानांची चेन आहे. करन हा सिएटलवरून बड्स मागवित होता, असं सूत्रांकडून कळतंय.

गांजा चे 4 -5 फ्लेवर आहेत आणि तो मुंबईत आणत होता. उत्तरप्रदेशच्या रामपुरमध्ये अली नावाचा व्यक्तीच्या कारखान्यात हर्बलच्या नावावर गांजा मिक्सिंग केला जात होता. त्यात करन इम्पोर्टेड बड्स ( हाय क्वालिटी गांजा ) मिक्स करून संयुक्त रित्या विकत होते, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे.

रामपुरच्या कारखान्याचा मालक अलीचा शोध सुरू आहे. ह्या प्रकरणात परदेशात सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे. समीर आणि करन ह्यांनी 15 महिन्यापासून ड्रग्स व्यवसायाची सुरुआत केली होती. समीर खानचं काम ड्रग्स व्यवसायात फायनांस करणे होते. याससंबंधीचे मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे सापडले आहेत ज्यात वेगवेगळ्या प्रकारची चॅट, वॉइस नोट आणि कॉल रेकॉर्डिंग पुरावे म्हणून सापडले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Strong evidence against Sameer Khan to NCB)

हे ही वाचा

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; एनसीबीकडून 10 तास कसून चौकशी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.