“भाजपने अन्य पक्षातून स्वतः मध्ये आलेल्याना भुंकायला सांगू नये”; टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे पार्टी विसर्जित करावी लागते आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

भाजपने अन्य पक्षातून स्वतः मध्ये आलेल्याना भुंकायला सांगू नये; टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 5:30 PM

मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून शिंदे गट आणि मविआच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी वाढल्या आहेत. त्यातच आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे तीन खासदार राहिले तरी बरं, स्वतःच्या पक्षाची लायकी काय ते बघावं आधी, आम्ही 400 ची गोष्ट करतोय आणि ते अजून 4 वरच आहेत.

त्यामुळे यांनी भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे पार्टी विसर्जित करावी लागते आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तर त्याच वेळी सदाभाऊ खोत यांनीही शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर ती टोळी आहे.

आणि त्या टोळीचे शरद पवार हे गब्बरसिंह असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी पलटवार करत या दोन नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

जशी सरड्याची उडी कुंपणापर्यंत असते तशीच यांची फक्त बारामतीपर्यंत उडी आहे अशी टीका चित्रा वाघ यांच्यावर विद्या चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रावादीतील नेत्यांवर भाजपकडून आणि शिंदे गटाकडून टीकासत्र चालूच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रतिहल्ला चढविण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विद्या चव्हाण यांनी हल्लाबोल चढविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसला टोळी म्हणणारे हे बाहरचे लोकं आहेत. ती लोकं भाजपची नाहीत असंही विद्याताई चव्हाण यांच्याकडून स्पष्ट केले गेले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे हे भाजपचे नाहीत जी नेते बाहेरच्या पक्षातून आले आहेत. त्यांच्याकडूनच ही टीका केली जात आहे.

त्यामुळे भाजप पक्षात बाहेरील पक्षातून आलेल्या नेत्यांवर विद्याताई चव्हाण यांनी टीका केली आहे. ज्या भाजपच्या नेत्यानी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. ज्या नेत्याकडून राष्ट्रवादी किंवा पवार यांना नाव ठेवण्यापेक्षा एकदा महागाई किंवा बेरोजगारीवर त्यांनी बोलावं असा जोरदार प्रतिहल्ला सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आला आहे.

भाजपचे समर्थन करणारे आणि भाजपमधील चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर आणि भाजपचे मित्र पक्षातील सदाभाऊ खोत यांच्याकडून वारंवार शरद पवार यांच्यावर टीका केली जाते.

त्यावर विद्या चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, जशी सरड्याची उडी कुंपणापर्यंत तशी यांची फक्त बारामतीपर्यंत उडी जाते. त्यामुळे भाजपने अन्य पक्षातून स्वतः मध्ये आलेल्याना भुंकायला सांगू नये असा प्रतिहल्ला विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.