रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू, जोरात दोर खेचल्याने कोसळला
मुंबई: रस्सीखेच खेळतेवेळी जोरात रस्सी खेचताना महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाच्या पटांगणात ही धक्कादायक घटना घडली. जिबीन सनी असं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. उत्कंठावर्धक स्पर्धा सुरु असताना, अचानक हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणारा जिबीन सनी हा कॉलेजमधील खेळात सहभागी झाला होता. रस्सीखेच […]
मुंबई: रस्सीखेच खेळतेवेळी जोरात रस्सी खेचताना महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाच्या पटांगणात ही धक्कादायक घटना घडली. जिबीन सनी असं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. उत्कंठावर्धक स्पर्धा सुरु असताना, अचानक हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणारा जिबीन सनी हा कॉलेजमधील खेळात सहभागी झाला होता. रस्सीखेच सुरु असताना जिबीनने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली ताकद लावून रस्सी खेचत होता. दोर खेचता खेचता त्याने जोर लावला आणि आपल्या मानेवर तो दोर घेतला. काही क्षण चढाओढ सुरुच होती, इतक्यात कुणालाही काही कळण्यापूर्वीच जिबीन अचानक कोसळला. नेमकं काय घडलंय हे कोणालाही कळलं नाही.
यानंतर कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
जिबीन हा सोमय्या विद्याविहारच्या नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी होता. 22 वर्षीय मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल. मात्र खेळता खेळता मृत्यू झाल्याने सर्वजण अवाक् झाले आहेत.
या घटनेची नोंद टिळक नगर पोलीस ठाण्यात झाली आहे.